माय नगर वेब टीम
अहमदनगर : कोल्हापूर येतील विशालगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा MIM पक्षाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला . विशालगड परिसरातील धार्मिक स्थळाची मोडतोड करून तेथील सर्व सामान्य नागरिकांचे संसार उद्वस्त करणाऱ्या समाज कंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणी करता MIMपक्षा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता .
विशालगड परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत MIM पक्षा च्या पदाधिकाऱयांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या . समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी करता या वेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.
यावेळी mim चे जिल्हा माहासचिव शेख जावेद हाजी, mim चे शहर प्रमुख सनाउल्ला खान , अमीर खान , शेख इम्रान,शेख कैसर, कार्याध्यक्ष शेख मतीन, अल्ताफ मुफ्ती, नगरसेवक फारूक शेख, मुजाहिद सय्यद, इम्रान शेख, अरशान शेख, फैजान शेख, समीर तांबटकर यांच्या सह mim पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
Post a Comment