सिना नदीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या पुलामुळे बुरुडगावकरांचा सुखकर प्रवास
माय नगर वेब टीम
अहमदनगर : पावसाळा जवळ आला की सीना नदीला पूर येतो, बुरुडगावचा संपर्क तुटला जात जनजीवन विस्कळीत होत होते, गेली अनेक वर्ष बुरुडगावकऱ्यांनी त्रास सहन केला. सीना नदीला पूर आल्यानंतर ग्रामस्थांना अरणगाव मार्गे प्रवास करावा लागत होता. त्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत असे, आता आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून बुरुडगाव सिना नदीवर सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले. आरसीसी उंच पूल बांधून दिल्यामुळे नागरिकांचा सुखकर प्रवास सुरू झाला, रात्री नगर शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदीला मोठा पूर आला मात्र पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे बुरुडगावकऱ्यांनी पुलावरून प्रवास केला आणि आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले.
आमदार संग्राम जगताप यांनी पुलाचे काम मार्गी लावून दिल्यामुळे बुरुडगावकरांचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे गावच्या विकासाला गती मिळेल असे मत गावचे उपसरपंच महेश निमसे यांनी केले.
बुरुडगावाजवळ सिना नदी आणि भिंगार नाला यांचे संगम होत असून पावसाळ्यात पूर आला की बुरुडगावकरांचा संपर्क तुटला जातो. मात्र यावरती सुमारे ५ आरसीसी पुलाचे काम मार्गी लावले असल्यामुळे बुरुडगावकरांचा पावसाळ्यातील पुराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. नगर शहर मतदार संघातील शाश्वत विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात असल्याचा आनंद होत असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
Post a Comment