माय नगर वेब टीम
अहमदनगर - हुंडई कंपनीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची दोन लाख 95 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. संजय दशरथ वाघ (वय 50 रा. कॉटेज कॉर्नर, आठरे पाटील पब्लिक स्कुल जवळ, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (30 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एका मोबाईल नंबरवरील विष्णु जैन (पूर्ण नाव, पत्ता नाही) नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघ यांचे कॉटेज कॉर्नर परिसरात चारचाकी वाहन दुरूस्तीचे वर्कशॉप आहे. ते 11 जुलै 2024 रोजी वर्कशॉपवर असतान त्यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला व त्या व्यक्तीने त्याचे नाव विष्णु जैन सांगून तुम्हाला हुंडई कंपनीची डिलरशीप देतो असे सांगितले. त्या व्यक्तीन हुंडई कंपनीच्या नावाने बनविलेल्या मेलवरून वाघ यांना मेल केले व त्यांचा विश्वास संपादन केला. डिलरशीपसाठी प्रोसेसींग फी म्हणून दोन लाख 95 हजार रूपये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर टाकण्यास सांगितले. त्यासाठी खाते क्रमांक पाठविला. वाघ यांनी त्या खात्यावर दोन लाख 95 हजार रूपये पाठविले. दरम्यान, त्या व्यक्तीने वाघ यांना हुंडई कंपनीची डिलरशीप दिली नाही. आपल फसवणूक झाल्याचे वाघ यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार प्रदीप बडे करत आहेत.
Post a Comment