सोयाबीन व कापूस उत्पादकांना १ ते १० हजारांचे अर्थसहाय्य ; खा. नीलेश लंके यांची माहीती



संमतीपत्र व ना हरकत पत्र देण्याचे आवाहन 

माय नगर वेब टीम 

पारनेर : राज्यातील सन २०२३च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतऱ्यांना अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार तर २ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी १० हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची माहीती खा. नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. या अर्थसहाय्यासाठी उत्पादक शेतऱ्यांनी संमतीपत्र व सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले  आहे. 



      खा. लंके यांनी सांगितले की, विविध कारणांमुळे झालेल्या किमतींमधील घसरणीमुळे सोयाबीन व कापूस उत्पादकांना नुकसान सोसावे लागले होते. शेतकऱ्यांना  दिलासा देण्यासाठी सोयाबीन व कापूस उत्पादकांना मदत करावी यासाठी आपण विधानसभा सदस्य असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश येऊन राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी २६४६.३४ कोटी तर कापूस उत्पादक शेतक-यांसाठी  १५४८.३४ कोटी अशा एकूण ४१९४.६८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 

      ज्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अ‍ॅप अथवा पोर्टलद्वारे सोयाबीन  व कापूस लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसह्याकरिता 

 पात्र राहतील. ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून  अर्थसहाय्य 

जमा करण्यात येणार असल्याचे लंके म्हणाले. 

      पात्र लाभार्थी शेतक-यांनी आपले संमतीपत्र व सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सबंधित कृषी सहाययकाकडे अधारकार्ड व बँक व आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर सादर करण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post