माय नगर वेब टीम
अहमदनगर : शुक्रवारी रात्री १२.३० वाजता, अ.नगर शहरातील नरहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली, आणि त्यांनी लगेचच खा. निलेश लंके यांना याची माहिती दिली.
सिंधी समाजाच्या चालिहो उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतत असताना खा. निलेश लंके यांनी तत्काळ आपल्या वाहनाची दिशा बदलून घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून, त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांना पाचारण केले.
नागरिकांनी वारंवार येणाऱ्या या समस्येचा उल्लेख केला असता, खा. लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
डॉन बॉस्को परिसरातील महिलेकडून खा. लंके यांचे आभार
नगर शहरातील डॉन बॉस्को परिसरात मुसळधार पावसामुळे घरासमोर आणि घरात पाणी साचल्याने एक महिला अडचणीत आली होती. रात्री १ वाजता तिने थेट संसद सदस्य खासदार लंके यांना संपर्क केला. लंके यांनी आपल्या सेवा आणि कर्तव्याची जाणीव ठेवत तात्काळ प्रतिसाद दिला आणि स्वतःची टीम तसेच अहमदनगर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम पाठवून मदत पोहोचवली. या महिलेनं आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करत. निलेश लंके यांच्या तात्काळ आणि तत्परतेच्या सेवाभावाचं आणि नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. खासदार लंके यांची सेवा आणि त्यांचे कार्य जनसामान्यांच्या भल्यासाठी नेहमी तत्पर आहे, हे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले.
Post a Comment