लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात इतक्या अर्जांची छाननी : प्रशासनाने केले महत्वाचे आवाहन



माय नगर वेब टीम 

अहमदनगर :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेल्या महिलांनी अर्जामध्ये नमूद केलेला बँक खाते क्रमांक आधारकार्डला संलग्न असणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला बँक खाते क्रमांक स्वतःच्या आधारकार्डला तात्काळ  संलग्न करून घ्यावा. बँक खाते क्रमांक संलग्न झाला आहे याची खात्री करावी. तसेच ज्या महिलांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी अर्जामध्ये जो बँक खाते क्रमांक नमूद करणार आहे तो बँक खाते क्रमांक आधारकार्डला सलग्न आहे याची खात्री करूनच तो बँक खाते क्रमांक ऑनलाइन  अर्जामध्ये नमूद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी  केले आहे. तसेच  जिल्ह्यातील ७ लाख ८ हजार  महिला लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले असून यापैकी ७ लक्ष अर्जांची छाननी  प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post