महायुतीला तडा, 'या' माजी आमदाराने फडकवला बंडा झेंडा



माय नगर वेब टीम 

बीड  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गुडघ्याला बाशिंग बांधलेले अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावू पाहत आहे. आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.


महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदाराचे काम मतदारसंघात कमी आहे. त्यामुळे मी महायुतीचा दावेदार आहे. जर तिकीट मिळालं नाही, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं म्हणत भाजपचे बीडच्या आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.


यावेळी भीमराव धोंडे म्हणाले की, आष्टी मतदारसंघात गतवेळी मला एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी मीच उमेदवारीचा दावेदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना मतदारसंघात प्रतिसाद कमी आहे. अशा स्थितीत आम्ही गप्प बसलो तर महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही मतदारसंघात संपर्क दौरे करत आहोत. विद्यमान आमदारांनी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काही जमले नाही, असं भीमराव धोंडे यांनी महायुतीच्या घटक पक्षाला दिला आहे.


दरम्यान, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे मतदारसंघात दौरे करत असून भाजपाकडून उमेदवारीचा दावा देखील त्यांनी केला आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ, असे म्हणत धोंडे यांनी एक प्रकारे अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धारच केल्याचे दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post