अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन : आमदार संग्राम जगताप

 


माय नगर वेब टीम 
अहमदनगर - वास्वातवादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधनाची लोक चळवळ उभी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील गीताच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे,कामगार वर्ग ला जागृत करण्याचे,कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या प्रचाराचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांनी कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून ओळखले जात असे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक लिखाण समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकरावे व समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

           सिद्धार्थ नगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आ. संग्राम जगताप समवेत अशोक गायकवाड, प्रा.माणिकराव विधाते, मा. नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते,साहेबराव पाचरणे, सागर गुंजाळ गजेंद्र भांडवलकर, विजय वडागळे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post