माय नगर वेब टीम
अहमदनगर : नगर-सोलापुर महामार्गावरील बनपिंप्री येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खा. नीलेश लंके यांनी शुक्रवारी थांबविली. या रस्त्याचे काम अपुर्ण असतानाच टोल वसुल करण्यात येत असल्याने खा. लंके यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काम पुर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये अशा सुचना दिल्या, त्यानंतर ही वसुली थांबविण्यात आली.
नगर-सोलापुर मार्गाचे काम अद्याप अपुर्ण आहे. काम अपुर्ण असतानाही टोल वसुली करण्यात येत असल्याबाबत खा. लंके यांच्याकडे यापूर्वी काही तक्रारी आल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी खा. लंके हे नगर-सोलापुर मार्गाने जामखेडकडे जात असताना बनपिंप्री टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली करण्यात येत होती. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले. खा. लंके यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम अपुर्ण असताना टोल वसुली करण्याचे कारण काय असा सवाल लंके यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. काम पुर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबविण्यात येईल असे अधिकाऱ्याने खा. लंके यांनी सांगितले व संबंधित कर्मचाऱ्यांना टोल वसुली न करण्याबाबत सुचना दिल्या.
खा. लंके यांनी या प्रश्नात लक्ष घालून टोल वसुली थांबविल्याबद्दल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
Post a Comment