पोलिस प्रशासनाकडून हाताची घडी तोंडावर बोट | नागरिकही वैतागले
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर-सोलापूर रोड, नगर-दौड रोड व नगर-पुणे महामार्गावर सुरु असलेल्या 'नाजूक' व्यवसाय थांबायलाच तयार नाहीत. जिल्हा पोलिस अधीक्षक, नगर तालुका पोलिस, स्थानिक पोलिस यांच्याकडे तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांकनाच निवेदने पाठविण्याच्या हालचाली परिसरातील नागरिकांनी सुरु केल्या आहेत.
नगर-सोलापूर रोडवर सुरु असलेल्या नाजूक व्यवसायाची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. नाजूक व्यवसायांना आळा घालण्याचे काम नगर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील पोलिसांकडून होतांना दिसत नाही. या व्यवसायांकडे पोलिस प्रशासनाचे अर्थ-पूर्ण दुर्लक्षच होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर-सोलापूर महामार्गावरील गोरे, पठारे बंधू आणि घोडके यांचा 'नाजूक' व्यवसाय पोलिसांच्या छुप्या आशिर्वादाने बिनधास्त सुरु असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. तसेच नगर-दौड रोडवरील कर्डिलेंचा व्यवसाय व एका पॅलेसवरील व्यवसाय चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी वारंवार छापेमारी होऊनही 'नाजूक' व्यवसाय बंद होत का नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याच परिसरात हुक्काचाही धूर निघू लागला आहे. पुणे महामार्गावरील रासकर यांच्या माध्यमातून एका पॅलेसमध्ये सुरु असलेला गोंधळ थांबायला तयार नाही. त्यामुळे पोलिस प्रशासन नेमकं करतंय काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मुख्यमंत्री घेणार नगर तालुक्यातील 'त्या' प्रकरणांची दखल!गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात 'नाजूक' व्यवसायांनी डोके वर काढले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. नगर तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यात तालुक्यातील पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. आता तालुक्याच्या हद्दीत सुरु असणाऱ्या नाजूक व्यवसायांची दखल खुद्द मुख्यमंत्री घेणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Post a Comment