महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा गुरुवारपासून शुभारंभ ; राणीताई लंके यांचा पुढाकार



रक्तदान शिबिराचेही आयोजन / खा. लंके यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ/ नीलेश लंके प्रतिष्ठाण करणार नियोजन

माय नगर वेब टीम 

पारनेर : महिलांमध्ये मोठया प्रमाणावर वाढत चालेल्या स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर-नगर मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या स्तन कर्करोग तपासणी शिबिराला गुरुवारपासून कर्जुले हर्या व पोखरी येथून सुरुवात होत आहे. 

         आरोग्य यज्ञ २०२४ या थीमखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा शुभारंभ गुरुवारी खा.नीलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच नीलेश लंकेे प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासंदर्भातील नियोजनासाठी  बैठक पार पडली होती.या बैठकीत राणीताई लंके यांनी या शिबिराची संकल्पना स्पष्ट केली होती.

      रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रूपयांचे विमा कवच मिळणार आहे. त्यात २ लाख रूपयांचा अपघाती विमा, ३ लाख रूपयांचा जीवन विमा, रक्तदाता तसेच त्याच्या नातेवाईकास १ वर्ष मोफत रक्त देण्यात येणार असल्याचे राणीताई लंके सांगितले. गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी या शिबिरांना कर्जुलेहर्या व पोखरी येथून प्रारंभ होणार असून दि. २९ सप्टेंबर रोजी चास व निंबळक येथे या शिबिरांची सांगता होणार असल्याचे राणीताई लंके यांनी सांगितले. 

        आठ दिवसांपासून या शिबिराच्या प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावरील कार्यकर्त्याने महिला स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. ससून रूग्णालयाची दोन पथके या शिबिरासाठी उपस्थित राहणार असून दररोज १ हजार ते १ हजार २०० महिलांची तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे.

         खा.नीलेश लंके प्रतिष्ठानने कोरोना संकटात जगात आदर्श काम केले. आता महिलांचा कॅन्सर तसेच रक्तदार शिबिराच्या माध्यमातूनही आदर्श काम उभे राहिल यात शंका नाही. महिलांच्या स्तन कॅन्सरबाबत जागरूकता वाढली आहे, ती अधिक वाढली पाहिजे यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. या आजारावर लवकर उपचार झाले तर लवकर मात करता येते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ४ ते ५ रूग्णांना जीवदान मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post