मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची पेढे तुला

 


 मनपा कर्मचाऱ्यांनी आपले शहर शिस्तबद्ध करण्यासाठी काम करावे - आ. संग्राम जगताप       

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : महानगरपालिकेत ठराविकच अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपले शहर म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्यासाठी काम करावे, शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आहे, मनपाचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यामध्ये मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला, अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी युनियनचा संघर्ष सुरू होता त्याला अखेर यश आले आहे,महापालिका कर्मचारी आणि आमचे अतूट नाते असून मी देखील महापालिकेत महापौर पदावर काम केले आहे, त्यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची माहिती झाली आणि ते आज मी सोडवत आहे मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे,असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

       अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेढे तुला करण्यात आली यावेळी जल अभियंता परिमल निकम, प्रभारी उपायुक्त मेहर लहारे, ज्ञानदेव पांडुळे, अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, राहुल साबळे, बलराज गायकवाड, दीपक मोहिते, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, ऋषिकेश भालेराव, संदीप चव्हाण, नंदकुमार नेमाने, अमोल लहारे, अजय सौंदे, विजय कोतकर, प्रफुल्ल लोंढे, बाळासाहेब व्यापारी, सागर साळुंखे, प्रकाश साठे, भरत सारवान, विठ्ठल उमप, सूर्यभान देवगडे, सखाराम पवार, अंतवन क्षेत्रे, अकील सय्यद, अजित तारू, भास्कर अकूबत्तिन,  राकेश गाडे, कॉम्रेड अनंत लोखंडे, राजेंद्र वाघमारे आदीसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासाठी संघर्ष करावा लागला आहे, आता तो मिळाला असून उत्पन्न वाढीसाठी काम करावे लागणार आहे आपला मार्केट विभाग काय करतो हेच माहीत नाही, आपल्या कर्तव्याची माहिती सर्वांना पाहिजे, आपल्या संस्थेची प्रगती हीच कर्मचाऱ्यांची प्रगती आहे तरी मरगळ झटकून काम करा, शहरातील नागरिकांबरोबर चांगला सुसंवाद ठेवून चांगली नागरी सेवा देण्यासाठी काम करावे, मनपा कर्मचाऱ्यांमध्ये कर्जबाजारीपणा आणि व्यसनाची असलेली सवय बंद करून आपल्या कुटुंबाकडे व संस्थेच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले,

       युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी प्रास्ताविकात म्हटले की, कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित होता तो मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला आता त्याला यश आले आहे, कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार सातवा वेतन आयोगासहित मिळणार आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे प्रश्न मार्गी लागला आता केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी सत्कार सोहळा व पेढे तुला या कार्यक्रमाचे आयोजन युनियनच्या वतीने करण्यात आले , कर्मचाऱ्यांचा वारस हक्काचा प्रश्न राज्य सरकार कडे प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी व स्वागत युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केले तर आभार जितेंद्र सारसर यांनी मानले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post