स्वच्छता ही सेवा अभियानात बागरोजा, सिद्धीबाग परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम



माय नगर वेब टीम 

अहमदनगर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गेल्या १३ दिवसांपासून आयोजित स्वच्छता ही सेवा अभियान अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी सकाळी या निमित्ताने नागरिकांच्या सहभागातून ऐतिहासिक बागरोजा परिसर व सिद्धीबाग परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.


शहरात गेल्या १३ दिवसांपासून सलग स्वच्छता मोहीम सुरू आहे. यात अनेक संघटना, नागरीक व अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले. सोमवारी या अभियानात ऐतिहासिक वास्तू असलेल्या बागरोजा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्या परिसरातील नागरी वसाहत, सिद्धीबाग उद्यान परिसरात नागरिकांच्या सहभागातून अभियान राबविण्यात आले. यावेळी झाडांचा पालापाचोळा, फांद्या, हरित कचरा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.


अभियानात मंगळवारी १ ऑक्‍टोबर रोजी सर्व मुख्‍य स्‍वच्‍छता निरीक्षक, सर्व स्‍वच्‍छता निरीक्षकांच्या सहभागातून शौचालय स्‍वच्‍छता अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानंतर सफाई मित्र सुरक्षा शिबिर झेंडीगेट व बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी महालक्ष्‍मी उदयान येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. विश्‍वंभरदास नयर माध्‍यमिक विदयालयाचे विदयार्थी, स्‍वामी समर्थ युवा प्रतिष्‍ठाण, मनपा कर्मचारी, उद्यान विभाग सर्व कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post