खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश ; अहमदनगर महापालिकेने घेतला मोठा निर्णय..



 नगर महानगरपालिकेडून शास्ती माफी जाहीर 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर  :   अहमदनगर महापालिका प्रशासनाकडून शहरातील मालमत्ता धारकांना शंभर टक्के शास्ती माफीची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माफीसाठी खासदार नीलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता. 

    शहरातील नागरीकांच्या मागणीचा विचार करून खा. लंके यांनी महापालिका प्रशासनाकडे त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. लंके यांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने २८ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदरांना मोठा दिलासा दिला आहे. या सवलतीचा लाभ १ ते २८  सप्टेंबर दरम्यान घेता येणार आहे. खा. नीलेश लंके यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्यासमवेत बैठक घेत शास्ती माफीची मागणी केली होती. या मागणीस पालिका प्रशासनाने मान्यता देत माफी जाहिर केली आहे. 

    थकबाकीदारांनी शंभर टक्के शास्ती माफीचा लाभ घेऊन दिलेल्या मुदतीत कर भरावा जेणेकरून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळता येईल. शहरातील चारही प्रभागांमध्ये रोख स्वरूपात कर जमा करण्याची सोय करण्यात आली असून क्यु आर कोड आणि चेकद्वारेही कर स्विकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post