पुणे हायवेवर रासकरांचा पॅलेसवर, दौंड रोडवर कर्डिलेंचा तर रुईत छमछम अन नाजूक व्यवसाय चर्चेत
माय नगर वेब टीम
अहमदनगर - खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनाच्या माध्यमातून नगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यच हादरुन सोडले. लंके यांनी केलेल्या रेटकार्डच्या आरोपामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतरचे काही दिवस शांत झालेले अवैध धंदे आता मात्र पुन्हा तेजीत सुरु असल्याची माहिती आहे. नगर तालुक्यात छमछमचा आवाज घुमू लागला असून नाजूक व्यवसायांनी तर नागरिकांच्या डोक्याला तापच आणला असल्याचे वास्तव आहे.
खासदार निलेश लंके यांनी पोलिस प्रशासनातील काही भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवला होता. त्या आंदोलनाचा काही दिवस फरक पडला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. काही धंद्यांवर कारवाईही करण्यात आली. परंतू काही दिवसांनतर पुन्हा ते धंदे जैसे थे झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कोणत्या गावाच, कोणत्या चौकात अवैध धंदे नाही असे एकही ठिकाण शोधूनही सापडणार नाही असे म्हटले जाते. याकडे नगर तालुक्याच्या कारभाऱ्यांनी एकदा पाहणे गरजेचे आहे. तालुक्यात मटका, जुगार अड्डे, सोरट, अंमली पदार्थांची विक्री, हुक्का पार्लर, लॉजिंग, कुंटणखाना असे अनेक अवैध धंदे सुरु आहेत. याकडे तालुक्याच्या पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रुईत छमछम अन नाजूक व्यवसाय, दौंड रोडचा कर्डिलेंचा अन पुणे महामार्गावर पॅलेस वर सुरु असलेला व्यवसाय हा तालुक्याच चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. खुलेआमपणे सुरु असलेल्या या धंद्यांकडे तालुका पोलिस कारवाई का करत नाहीत. ग्रामीण डीवायएसपी यांचे पथक नेमके काय करतेय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खमकी भूमिका घेऊन तालुक्यातील अवैध धंद्यांना लगाम घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment