माय नगर वेब टीम
पारनेर : गेल्या दोन दिवसांपासून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पीकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दोन दिवसांपासून संततधार तसेच अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या उभ्या शेतपीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, मुग, कांदा, भुईमुग व इतर पीकांचा नुकसानीमध्ये समावेश आहे. कान्हूरपठार येथील शेतक-यांच्या सोयाबीन पीकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून त्याचेही पंचनामे करण्यात यावेत या मागणीसोबतच नगर दक्षिण मतदारसंघातील ज्या ज्या गावांमध्ये पीकांचे नुकसान झाले आहे त्या गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी लंके यांनी केली आहे.
या पत्राच्या प्रती नगर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगांव, पाथर्डी, राहुरी व पारनेरच्या तहसिलदारांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
Post a Comment