महिला कॅन्सर तपासणीसाठी राणीताईंचा पुढाकार ; रक्तदान शिबिराचेही आयोजन



हंग्यात नियोजन बैठक / १९  ते २९ सप्टेंबर दरम्यान शिबिरांचे आयोजन 

नीलेश लंके प्रतिष्ठाण करणार नियोजन

माय नगर वेब टीम 

पारनेर : महिलांमध्ये मोठया प्रमाणावर वाढत चालेल्या स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर-नगर मतदार संघात स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य यज्ञ २०२४ या थीमखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये रक्तदार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. 

     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच नीलेश लंकेे प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासंदर्भातील नियोजनासाठी रविवारी हंगे येथे बैठक पार पडली. या बैठकीत राणीताई लंके यांनी या शिबिराची संकल्पना स्पष्ट केली. यावेळी खा. नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

      रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रूपयांचे विमा कवच मिळणार आहे. त्यात २ लाख रूपयांचा अपघाती विमा, ३ लाख रूपयांचा जीवन विमा, रक्तदाता तसेच त्याच्या नातेवाईकास १ वर्ष मोफत रक्त देण्यात येणार असल्याचे राणीताई लंके यांनी यावेळी बोलताना सांगितले. गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी या शिबिरांना कर्जुलेहर्या व पोखरी येथून प्रारंभ होणार असून दि. २९ सप्टेंबर रोजी चास व निंबळक येथे या शिबिरांची सांगता होणार असल्याचे राणीताई लंके यांनी सांगितले. 

      नियोजनाच्या बैठकीस खा. नीलेश लंके यांच्यासह राणीताई लंके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, युवतीच्या तालुकाध्यक्ष पुनम मुंगसे, माजी सभापती सुदाम पवार, रा.या. औटी, अ‍ॅड राहूल झावरे,  बाळासाहेब खिलारी, दिपक लंके, ज्ञानदेव लंके, राजेंद्र शिंदे, प्रविण वारूळे, रामा तराळ, रविंद्र राजदेव, दत्ता निवडूंगे, संदीप मगर, दादा शिंदे, डॉ. आबासाहेब खोडदे,  सतिश भालेकर, अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, अशोक रोहोकले, बाळासाहेब पुंडे, बंडू शिरोळे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, अशोकराव घुले, बापूसाहेब भापकर, प्रा. संजय लाकूडझोडे, लकी कळमकर, विजय डोळ, राधाकृष्ण वाळुंज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


    एका दिवशी दोन केंद्रांवर या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. आठ दिवस आगोदर या शिबिराचा प्रचार व प्रसिध्दी करण्यात येईल. प्रत्येक केंद्रावरील कार्यकर्त्याने महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करावी. ससून रूग्णालयाची दोन पथके या शिबिरासाठी उपस्थित राहणार असून दररोज १ हजार ते १ हजार २०० महिलांची तपासणी या शिबिरात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.

    खा.नीलेश लंके प्रतिष्ठानने कोरोना संकटात जगात आदर्श काम केले. आता महिलांचा कॅन्सर तसेच रक्तदार शिबिराच्या माध्यमातूनही आदर्श काम उभे राहिल यात शंका नाही. महिलांच्या स्तन कॅन्सरबाबत जागरूकता वाढली आहे, ती अधिक वाढली पाहिजे यासाठी नीलेश ंलके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. या आजारावर लवकर उपचार झाले तर लवकर मात करता येते. रक्तदान शिबराच्या माध्यमातून ४ ते ५ रूग्णांना जीवदान देता येते.असे ससून (पुणे) रुग्णालयाचे डॉ. किरण जाधव म्हणाले.



सहकारी जबाबदारी पार पाडणार

सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी आपण या शिबिरांचे आयेाजन केले असून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आपल्या सामुहीक प्रयत्नांतून ही शिबिरे यशस्वी होतील यात काडीहीची शंका नाही. सहकाऱ्यांच्या जीवावरच या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून ती जबाबदारी प्रत्येक सहकारी यशस्वी पार पाडेल

राणीताई लंके

मा. जि. प .सदस्या


ग्रामीण महिलांच्या तपासणीसाठी शिबिर

महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरमुळे देशामध्ये चिंता आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात तपासण्या करण्यात येत नाहीत. त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांना पाच लाखांचे विमा कवच मिळणार आहे.

खा. नीलेश लंके 


 

पारनेर शहरात नियोजन 

राणीताई लंके यांच्या आवाहानानंतर पारनेर शहर व परिसरातील महिलांच्या तपासणीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. एकही महिला या सुविधेपासून वंचित राहणार नाही यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक दक्षता घेणार आहेत. रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी विशेषतः तरूणांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

अर्जुन भालेकर 

जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post