माय नगर वेब टीम
मुंबई : राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर असंतोष निर्माण झाला होता. बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात खदखद व्यक्त केली जात होती. या संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे.
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आलाय. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून आरोपी अक्षय शिंदेला योग्य शिक्षा मिळाली असल्याचं काही नागरिकांतून बोललं जात आहे. तसेच पोलिसांचे मनःपूर्वक आभार देखील मानले जात आहेत.
मुख्यंमत्री शिंदे साहेब आभार...
या एन्काउंटर नंतर जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या नराधमास फाशी व्हावी अशी मागणी केली जात होती. एन्काउंटर झाल्याने त्यास योग्य शिक्षा मिळाली असल्याचे बोलले जात आहे. अशी कठोर शिक्षा झाल्याने आया बहिणींवर वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत कोणीही करणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व त्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे देखील अभिनंदन अशा प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.
Post a Comment