भिंगार ब्राह्मण समाज महासंघाचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा



माय नगर वेब टीम 

 अहिल्यानगर : नगर शहर, उपनगर, भिंगारमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी भरीव विकास कामे केली आहेत. त्यामुळे नगर शहरासह भिंगारचा चेहरा मोहरा बदलला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्यामुळे होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भिंगार ब्राह्मण समाज महासंघाच्यावतीने आ. जगताप यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला.


भिंगारमध्ये ब्राह्मण समाज महासंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आ. जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावेळी आ. संग्राम जगताप यांचा सत्कारही केला. यावेळी सकल ब्राह्मण समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोद्दार, भिंगार ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास देशमुख, संजय मुळे, चेतन वसगडेकर, अनिल औटी, चंद्रशेखर चौधरी, चंद्रशेखर देशपांडे, प्रदीप मुळे, पंकज धर्माधिकारी, सुनील देशमुख, किरण मुळे, सम्राट धर्माधिकारी,  श्रीगोपाल जोशी, मयूर जोशी, दिनेश जोशी, प्रमोद कुलकर्णी, अभिजीत वसगढेकर, योगेश दाणी यांच्यासह ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सकल ब्राह्मण समाज महासंघाने आमदार संग्राम जगताप यांना नगरभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या विकास कामांमुळे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानामुळे मिळाला आहे. आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली आहेत. ज्यामुळे समाजातील विविध घटकांना मदत मिळाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post