जिल्हा बँक भरती: 700 जागांसाठी 'इतके' अर्ज



माय नगर वेब टीम 

अहमदनगर -जिल्हा बँकेच्या रिक्त असणार्‍या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेच्या विविध पदाच्या 700 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत 27 सप्टेंबरला संपली होती. त्यानुसार ऑनलाईन दाखल अर्जातून पात्र उमेदवारांची यादी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. दरम्यानच्या 700 जागांसाठी अंदाजे 27 ते 28 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या भरतीसाठीच्या पात्र उमेदवारांच्या यादीवरून दिसत आहे.


जिल्हा बँकेच्या जनरल मॅनेजर संगणक 1, मॅनेजर संगणक 1, डेप्युटी मॅनेजर 1, इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक 1, क्लेरिकल 687, वाहनचालक सबॉर्डिनेट (ए) 4, सुरक्षा रक्षक सबॉर्डिनेट ‘बी’ 5 अशा 700 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी 13 ते 27 सप्टेंबर दरम्यान बँकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या वर्कवेल कंपनीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होती. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून बँक आणि कंपनीच्यावतीने बँकेच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.


यात जनरल मॅनेजर संगणक 11, मॅनेजर संगणक 17, डेप्युटी मॅनेजर संगणक 18, इनचार्ज प्रथम श्रेणी संगणक 28, क्लेरिकल सुमारे 26 ते 27 हजार, वाहन चालक सबॉडिनेट (ए) सुमारे 800 ते 900, सुरक्षा रक्षक सर्बार्डिनेट ‘बी’ सुमारे 250 ते 300 उमेदवारांचे अर्ज पात्र असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, बँकेच्यावतीने दाखल ऑनलाईन अर्जाची आकडेवारी घेण्यात येत असल्याचे बँक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post