अजय महाराजांना मारहाण; 'ते' दोघे अटकेत



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतलेले अजय महाराज बारस्कर यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गोपीचंद सुनील आरडे व साजीद अब्दुल लतिफ लाला शेख (दोघे रा.बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय महाराज बारस्कर हे गुरुवारी त्यांच्या बोल्हेगाव येथील घरी होते. रात्री आठच्या सुमारास गेट उघडून दोन जण आत आले व त्यांनी शिविगाळ सुरू केली. अजय महाराज बारस्कर यांच्या आईने त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा सुरू असल्याने महाराज घराबाहेर आले. त्यावेळी या दोघांनी महाराजांना मारहाण केली. महाराजांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post