हरियाणातील भाजपला मिळालेला विजय आत्मविश्वास वाढवणारा- डॉ. सुजय विखे पाटील



माय नगर वेब टीम 

 शिर्डी -हरीयाणा राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय आत्मविश्वास वाढविणारा असून,विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनता विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात असल्याचा संदेश या निकालाने दिला असल्याची प्रतिक्रीया महसूल तथा पालक मंत्री ना.याधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


हरीयाणा राज्यात सलग तिसर्यांदा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,केद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री जे.पी नड्डा आणि हरीयाणा मधील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,लोकसभे मध्ये फेक नॅरेटिव्हचा उपयोग करून विरोधकांनी निर्माण केलेल्या वातावरणाला हरीयाणांच्या  निकालाने चपराक दिली असून, देशातील जनता खोट्या प्रचाराच्या नव्हे तर विकासाच्या मागे उभी राहाते या विजयाने दाखवून दिले आहे.


हरीयाणा मध्ये निवडणुकीच्या आधी अग्निवीर योजनेच्या विरोधात जाणीवपुर्वक वातावरण निर्माण केले गेले.खेळाडूना पुढे करून राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.यासर्व घटनांना हरीयाणातील जनतेन मतदानातून नाकारले आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या राजकारणाला पाठबळ दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.


जम्मू काश्मिर मध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रीयेला या निवडणुकीच्या निमिताने बळकटी मिळाली असून,अतिशय भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पाडल्याचा सकारात्मक संदेश संपूर्ण जगामध्ये गेला आहे.३७० कलम रद्द केल्यानंतर कश्मिर मध्ये रक्ताचे पाट वाहतील असे वातावरण करणार्याना सुध्दा आजच्या निकालाने उतर मिळाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.


हरीयाणाच्या विजयामुळे तसेच जम्मू काश्मिर मध्ये मिळालेल्या यशामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला असून आजचा विजय म्हणजे लोकांसाठी  अधिकचे काम करण्यासाठी मिळालेली उर्जा असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post