नीलेश लंके, राणी लंके यांच्या संकल्पनेतून २०० भजनी मंडळांना साहित्याचे वितरण
माय नगर वेब टीम
पारनेर : विश्व हिंदू परिषदेकडून वारकऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनाशिवाय भारतात प्रथमच हंगा येथे होत असलेला मेळावा आपण अनुभवल्याचे गौरवोद्गार ह.भ.प.नारायण महाराज जाधव यांनी काढले.
खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील २०० भजनी मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, राजकारणी व्यक्तीकडून धर्म संस्कृतीचा जतन करण्याचा हा प्रयत्न आहे. खा. लंके यांनी ही परंपरात जतन करून संत निळोबारायांचे अनुकरण केले आहे. नीलेश लंके यांनी त्यांचे नाव सार्थ आहे. मी कोणीतही आहे ही जाणीव मनाला दुःख देते मात्र लंके यांच्याकडे नम्रता पहावयास मिळते. नीलेश लंके ही अद्भुत शक्ती असून समाजासाठी काही करावे लागले याचा अर्थ त्यांच्या जिवनात संतांची प्रेरणा असल्याचे ते म्हणाले.
खा. लंके म्हणाले, आजचा दिवस हा अविस्मरणीय आहे. आजवर राजकीय, सामाजिक, धार्मीक क्षेत्रात काम करताना असा योग पहावयास मिळाला नाही. आज हा योग तुमच्यामुळे जुळून आला आहे.
लंके पुढे म्हणाले, आपण काय कमविले त्यापेक्षा आपण समाजासाठी काय केेले हे महत्वाचे असते. ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली त्याचे नामस्मरण केले पाहिजे. कारण ईश्वरामुळेच या सृष्टीचा समतोल राखला गेला आहे. अध्यात्मात ताकद आहे. सर्व गोष्टी अध्यात्माजवळ येऊन थांबतात. ज्याच्यावर अध्यात्माचे संस्कार आहेत त्यास निश्चितच यशाची पावती मिळते. संपत्ती किंवा राजकारणात तुम्ही किती पुढे गेेले हे महत्वाचे नाही तर अध्यात्म महत्वाचे आहे.
अध्यात्माची जोड असेल तर माणूस सुसंस्कृत होतो
बुध्दीच्या जोरावर माणूस पुढे जातो, अधिकारी होतो. मात्र त्यास अध्यात्माची जोड असेल तर तो सुसंस्कृत अधिकारी होतो. समाजाची कामे करतो. राजकारण्यांनाही अध्यात्माची जोड असेल तर त्यांच्याकडून चांगले काम होते असे खा. लंके म्हणाले.
भजन स्पर्धेचे आयोजन करणार
आपल्याकडे नामवंतांनाही लाजवेल असे भजनी आहेत. पट्टीचे भजनी आहेत. त्यांच्यातील या गुणांना वाव दिला तर ते दुरचित्रवाणीवर दिसतील. त्यासाठी दरवर्षी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी पाच लाखांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
वारकऱ्यांच्या मानधनाची मागणी करणार
वारकऱ्यांच्या मानधनाची मागणी करण्यात येत आहे. राज्यात आपले सरकार आल्यावर आपण राज्यातील वारकऱ्यांना मानधन सुरू करण्याची मागणी करणार आहोत. अध्यात्माचा वारसा जपणारांचा मान सन्मान झाला पाहिजे ही आपली भावना असल्याचे लंके म्हणाल्या.
त्याला भाग्य लागते
कोणाच्याही तोंडून रामकृष्ण हरी येत नाही. त्याला भाग्य लागते. विधानसभेत व लोकसभेत आपण शपथ घेतल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणालो.त्यानंतर असंख्य वारकऱ्यांचे मला फोन आले. रामकृष्ण हरी या शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही शब्दात नाही. देश सुसंस्कृत घडवायचा असेल तर वारकरी शिक्षण संस्था उभ्या राहील्या पाहिजेत आपल्या मतदारसंघात सर्वाधिक वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचे माझे स्वप्न असल्याचे लंके म्हणाले.
तर शाळेत हरिपाठाचा तास !
माझ्या हाती सुत्रे आली तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक तास हरीपाठासाठी करेल. तो दिवस एक दिवस निश्चित येईल असा विश्वास व्यक्त करतानाचा लंके यांनी पारनेर शहरात सुसज्ज वारकरी भवन उभारण्याचा संकल्प केला.
आम्ही धन्य झालो
हंगे येथे नव्याने उभारलेल्या सभागृहाला वारकऱ्यांचे पाय लागले म्हणजे या सभागृहाचे उद्घाटन झाले असेच म्हणावे लागेल. आम्ही हंगेकर धन्य झालो, आमचे गाव धन्य झाले असे सांगत वारकऱ्यांच्या उपस्थितीत या सभागृहाचे उद्घाटन झाल्याचे जाहिर करतानाच कोणत्याही पुढाऱ्याला त्यासाठी बोलविण्यात येणार नसल्याचे खा. लंके म्हणाले.
वारकऱ्यांना पाच लाखांचा विमा
अलिकडेच आम्ही महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरचे शिबिर घेतले. रक्तदान शिबिर घेतले. रक्तदात्यांना पाच लाखांचा विमा दिला. आता मतदारसंघातील सर्व वारकऱ्यांना पाच लाखांच्या विम्याचे कवच देण्याची घोषणा खा. लंके यांनी यावेळी केली.
Post a Comment