विधानसभेची ही निवडणूक अहिल्यानगरच्या भविष्याची; आमदार संग्राम जगताप नेमकं काय म्हणाले



जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनच्या वतीने नाभिक समाजाचा मेळावा संपन्न

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  – आपल्या अहिल्यानगर शहराच्या सर्वागीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आज शहराच्या प्रत्येक भागांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकास कामे पूर्णत्वास येत आहेत. भविष्यात आपले नगर शहर एक विकसित शहर म्हणून उदयास येणार आहे. ही विधानसभा निवडणूक माझी नसून आपल्या अहिल्यानगर शहराच्या भविष्याची निवडणूक आहे. त्यामुळे सर्व जनतेने मला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी करून शहरातील नाभिक समाजासाठी जीवाजी महाले चौक नामकरण, सारस नगर येथे खान्देश युवा मंच साठी नऊ गुंठे जागा, जिल्हा नाभिक समाज ट्रस्टसाठी तपोवन रोड येथे पाच गुंठे जागा, संत सेना महाराज मार्ग नामकरण, अशा विविध प्रकारे केलेल्या कामाचा आढावा आ.जगताप यांनी भाषणातून घेतला.


            विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनच्या वतीने शहरातील नाभिक समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.जगताप यांनी समाजातील नागरिकांशी संवाद साधला. मेळाव्यात नाभिक समाजासाठी आ.संग्राम जगताप यांनी मोठे योगदान देवून अनेक प्रश्न व मागण्या मार्गी लावल्या बद्दल नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष सुनील वाघमारे, राज्य संघटक विकास मदने, शहाजी कदम, सलून असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, जीवन सोनीस, ज्ञानेश्वर निकम, शेख सत्तार, रहमत शेख, नसीर, नंदकुमार अहिरे, सुनील जाधव, शरद दळवी, अमित वाघमारे, मनिष शिंदे, अरुण वाघ, महेंद्र जाधव, किशोर मोरे, बापू क्षीरसागर, नवनाथ मदने, अशोक खामकर आदींसह माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अविनाश घुले आदींसह मोठ्या संख्यने नाभिक समाजातील नागरिक उपस्थित होते.


            यावेळी जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी संग्राम जगताप यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सर्व नाभिक समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. तसेच नव्या मंत्रीमंडळात आ.जगताप मंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


            या मेळाव्यास शहरातील समाजातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये अहमदनगर सलून चालक मालक असोसिएशन, खान्देश युवा मंच, सलमानिया जमात,  तेलगू नाव्ही संघटना आदींचा पदाधिकारी उपस्थित होते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post