मोठी बातमी : भाजपची पाहिली यादी जाहीर, नगरमध्ये पाच उमेदवार फायनल...



माय नगर वेब टीम
मुंबई : शिर्डीत – राधाकृष्ण विखे पाटील तर कर्जत जामखेड मतदार संघात राम शिंदे तर श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुते, राहुरीत कर्डीले तर शेवगाव मध्ये पुन्हा मोनिका राजळे यांना उमेदवारी.

भाजपाची पहिली यादी जाहीर, 99 जणांची नावं घोषित, पहिल्या यादीत फडणवीसांना स्थान.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी दिला आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस लढणार आहेत. तसंच कामठी येथून चंद्रशेखर बावनकुळे  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे.

बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

कर्जत जामखेड मतदार संघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. तसंच कोथरूडमधून चंद्रकांत आणि पर्वती माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इचरकरंजीतून आमदार प्रकाश आवाडेंऐवजी त्यांचा मुलगा राहूल आवाडेंना तिकीट दिलं आहे. तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. तिथे सुलभा कालू गायकवाड यांच्या नावाची घोषणा कऱण्यात आली आहे.  मालाड पश्चिम येथून आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी _शिवाजीराव_ कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे

इथे वाचा भाजपच्या 99 उमेदवारांची नावं


1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस

2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे

3. शहादा – राजेश पाडवी

4. नंदुरबार – विजयकुमार कृष्णराव गावित

5. धुळे – अनुप अग्रवाल

6. सिंदखेडा – जयकुमार जितेंद्रसिंग रावल

7. शिरपूर – काशीराम वेचन पावरा

8. रावेर – अमोल जावले

9. भुसावळ – संजय वामन सावकारे

10. जळगाव – सुरेश दामू भोले

11. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण

12. जामनेर – गिरीश दत्तात्रेय महाजन

13. चिखली – श्वेता विद्याधर महाले

14. खामगाव – आकाश पांडुरंग फुंडकर

15. जळगाव (जामोद) – डॉ. संजय श्रीराम कुटे

16. अकोला पूर्व – रणधीर प्रल्हादराव सावरकर

17. धामगाव रेल्वे – प्रताप जनार्दन अडसद

18. अचलपूर – प्रविण तायडे

19. देवली – राजेश बकाने

20. हिंगणघाट – समीर त्र्यंबकराव कुणावर

21. वर्धा – पंकज राजेश भोयर

22. हिंगणा – समीर दत्तात्रेय मेघे

23. नागपूर दक्षिण – मोहन गोपालराव माते

24. नागपूर पूर्व – कृष्ण पंचम खोपडे

25. तिरोरा – विजय भरतलाल रहांगडाले

26. गोंदिया – विनोद अग्रवाल

27. अमगाव – संजय हनवंतराव पुरम

28. आमोरी – कृष्णा दामाजी गजबे

29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

30. चिमूर – बंटी भांगडिया

31- वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32-रालेगाव – अशोक उडके

33-यवतमाळ – मदन येरवर

34-किनवट – भीमराव केरम

35-भोकर – क्षीजया चव्हाण

36-नायगाव – राजेश पवार

37-मुखेड – तुषार राठोड

38-राहुरी – शिवाजीराव कार्डिले

39-शेवगाव – मोनिका राजले

40-शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

41-पार्वती – माधुरी मिसाळ

42-कोथरुड – चंद्रकांत पाटील

43-शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले

44-भोसरी – महेश लांडगे

45-चिंचवड – शंकर जगताप

46-दौंड – राहुल कुल

47-उरण – महेश बाल्दी

48-पनवेल – प्रशांत ठाकूर

49-कुलाबा – राहुल नार्वेकर

50-मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

51-वडाळा – कालिदास कोळंबकर

52-सायन-कोळीवाडा – कॅप्टन आर. तमिल सेल्वन

53-वांद्रे पश्चिम – आशिष शेलार

54-घाटकोपर पश्चिम – राम कदम

55-विलेपार्ले – पराग अलवणी

56-अंधेरी पश्चिम – अमित साटम

57-गोरेगाव – विद्या ठाकूर

58-मलाड पश्चिम – विनोद शेलार

59-चारकोप – योगेश सागर

60-कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61-मुलुंड – मिहिर कोटेचा

62-दहिसर – मनीषा चौधरी

63-बेलापूर – मंदा म्हात्रे

64-ऐरोली – गणेश नाईक

65-ठाणे – संजय मुकुंद केळकर

66-डोंबिवली – रवींद्र चव्हाण

67-कल्याण पूर्ण – सुलभा गायकवाड

68-मुरबाड – किसन कथोरे

69-भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

70-नालासोपारा – राजन नाईक

71-नाशिक पश्चिम -सीामा हिरे

72-नाशिक पूर्व – राहुल ढिकाले

73-चंदवड – राहुल अहेर

74-बगलान – दिलीप बोरसे

75-गंगापूर – प्रशांत बंब

76-औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

77-फुलंब्री – अनुराधा चव्हाण

78-भोकरदन – संतोष रावसाहेब दानवे

79-बदनापूर – नारायण कुटे

80-परतूर – बबनराव लोणीकर

81-जिंतूर – मेघना बोर्डिकर

82-हिंगोली – तानाजी मुटकुले

83-श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

84-कर्ज जामखेड – राम शिंदे

85-केज – नमिता मुंदडा

86-निलंगा – संभाजीपाटील निलांगेकर

87-औसा – अभिमन्यू पवार

88-तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील

89-सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

90-अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

91-सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

92-मान – जयकुमार गोरे

93-कराड – अतुल भोसले

94-सातारा – छत्रपती शिवेंद्र राजे भोसले

95-कणकवली – नितेश राणे

96-कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक

97-इजलकरंजी – राहुल अवाडे

98-मीरज- सुरेश खाडे

99- सांगली – सुधीर गाडगीळ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post