मेहेकरी विद्यालय आदर्श, स्वच्छ व सुंदर विद्यालय : आ.बबनराव पाचपुते

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहेकरी ही जिल्ह्यातील एक आदर्श स्वच्छ व सुंदर शाळा आहे.


शासनाचा  स्वच्छ व सुंदरशाळा पुरस्कारही विद्यालयाला मिळालेला आहे. या विद्यालयाने लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, खाजगी कंपन्या यामधून निधी उभा करत लाखो रुपयांची कामे पूर्ण केली, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काढले.


आ. बबनराव पाचपुते यांनी विद्यालयाला सिमेंटचा रस्ता व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पेविंग ब्लॉक साठी निधी दिला. ते काम पूर्ण झाल्यानंतर पाचपुते  यांनी शाळेत येऊन पाहणी केली.  यावेळी ते बोलत होते.


 ते पुढे बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व बहुजन समाजाची मुले येथे शिक्षण घेत असल्याचा मला आनंद होत आहे असेही ते म्हणाले.


प्राचार्य विकास गोबरे यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने एक कोटीची इमारत बांधून दिलेली आहे. आज विद्यालयामध्ये तालीम,बाग,विविध खेळाचे मैदाने , कारंजे, इंडोअर गेम हॉल, सभागृह,  डिजिटल वर्ग अशी अनेक कामे पूर्ण झालेली आहेत.


 यावेळी मेहेकरी गावचे सरपंच नंदूशेठ पालवे, महेश लांडगे,  करपे तात्या आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी आर बी  यांनी केले. आभार पर्यवेक्षक कातोरे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post