मी मंत्री होणार, कर्जत- जामखेडचा विकास अधिक वेगाने होणार; आमदार रोहित पवारकाय म्हणाले पहा..



खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता बैठक मेळावा संपन्न..

माय नगर वेब टीम 

      जामखेड - माझी उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्त्यांचीच उमेदवारी समजून विरोधी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करा असे उद्गार रोहित दादा पवार यांनी काढले. 

ते खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आयोजित कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. 

यावेळी विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, प्रशांत राळेभात, रमेश आजबे,सचिन शिकारे, सिद्धेश्वर लटके, सागर कोल्हे, रामहरी गोपाळघरे, हनुमंत पाटील, बापू कार्ले,इत्यादी उपस्थित होते. 

आमदार पवार बोलताना पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वांनी मागील वेळी मला सहकार्य केल्यामुळे मी आमदार झालो. त्यामुळे राज्यात कर्जत,जामखेड करांचे वजन वाढले आहे, राज्यात पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मी खात्रीने मंत्री होणार असल्याने कर्जत, जामखेड मतदार संघाचा विकास यापुढे आधिक गतीने केला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच मला मतदारसंघात जखडून ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होणार आहे, मला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यात प्रचार करण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून काम करावे व विरोधकांचा पराभव आपल्या सर्वांना करावा लागेल, तसेच बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना सर्वांनी बळ द्यावे कोणीही दबावाला बळी न पडता प्रचार करावा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली.

यावेळी त्यांनी गटातील प्रत्येक गावातील बुथवर मागील विधानसभा व लोकसभेला पडलेल्या मतांची आकडेवारी तपासून यावेळी विधानसभेला प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल याबाबत गांभीर्याने काम करावे असे सांगितले तसेच या निवडणुकीत मी विधानसभेला शंभर टक्के निवडून येणार असल्याची मला पूर्ण खात्री आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्याबरोबर राहणाऱ्या कार्यकर्त्यालाच पुढील काळात मी बळ देऊन सहकार्य करणार असून विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढील पाच वर्षात पुन्हा मदत करणार नसल्याची तंबी आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिली.


यावेळी सोशल मीडियाच्या कार्यकारणीचे कार्यकर्त्यांना पदांचे प्रमाणपत्र आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच खर्डा येथील इंजिनियर महादेव धोत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती सेलच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल व पत्रकार दत्तराज पवार यांची दैनिक जनता आवाज या वृत्तपत्राच्या जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी मुकुंद अप्पा गोलेकर, मोहनराव लोखंडे, सुनील साळुंखे, प्रशांत वारे, अशोक पठाडे,नयुमभाई शेख, दत्तात्रय भोसले, हरिभाऊ गोलेकर, चंद्रकांत गोलेकर, कल्याण सुरवसे,ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, मदन पाटील, प्रकाश गोलेकर, दादा जमकावळे, दीपक जावळे, अशोक खटावकर,आसाराम गोपाळघरे, युवराज उगले, काका कोल्हे, राजेंद्र गोलेकर,शिवाजी भोसले,राजू सय्यद, ज्ञानेश्वर इंगोले, कैलास गोलेकर,अभिमान गीते, अशोक गीते, भगवान गोपाळघरे, रतिलाल डोके, अन्सार पठाण, अर्जुन सुरवसे इत्यादी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post