नागपूर बोल्हेगाव उपनगराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागणार : आमदार संग्राम जगताप

 


मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून चैतन्य हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत तसेच पितळे कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नागापूर बोल्हेगाव हे शहराचे मोठे उपनगर असून या ठिकाणी एमआयडीसी कंपनीतील कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहत असून त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून घेतला आहे, त्यामुळे कॉलनी अंतर्गत देखील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहे, नागापूर गांधीनगर रस्ता मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले असून अर्धे काम पूर्ण देखील झाले आहे, आता चैतन्य हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे हा मुख्य रस्ता असून अनेक दिवसांपासून प्रलंबित पडला होता रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत,आता हा रस्ता कॉंक्रिटीकरण होणार असून कायमस्वरूपीचे काम मार्गी लावले आहे त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

      मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून चैतन्य हॉटेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत तसेच पितळे कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, राजेश कातोरे, हनुमंत कातोरे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे,  त्रिंबके काका, सागर शिरसाठ, साई भोसले, वाघमारे सर, कुलकर्णी काका. जगताप मामा, भराट काका, गौरव अकोलकर,भाऊ इथापे, राम जंगले, विशाल आरे, विशाल घटे, वसंत पवार, दिलीप पेटकर, अविनाश कव्हाने, हरीभाऊ जंगले,अनिल भोसले, अशोक भापकर, सचिन साळवे अशोक पवार, तुषार केदारे, ससे साहेब, रोहन काळे आदी उपस्थित होते.      कुमारसिंह वाकळे म्हणाले की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले असून आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहेत नागापूर बोल्हेगाव हा परिसर पूर्वी ग्रामपंचायत हद्दीमध्ये समाविष्ठ होता कुठल्याही विकासाच्या सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये नियोजनबद्ध विकासाची कामे मार्गे लावले असल्यामुळे या परिसराला शहरीकरणाची ओळख निर्माण झाली आहे नागापूर गांधीनगर या रस्त्याचे काम मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post