आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; राज्य सरकारच्या वतीने जैन अल्पसंख्याक आर्थिक समाज विकास महामंडळाची स्थापना



सकल जैन समाजाच्या वतीने नागरी सत्कार संपन्न

शहरात यापूर्वी कधी ही न झालेले कामे पूर्णत्वाकडे जात आहे - आ.संग्राम जगताप

माय नगर वेब टीम 

 अहमदनगर : जैन समाजाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचविण्यासाठी राज्य सरकारने अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पत्र व्यंहवार करून पाठपुरावा केल्यामुळे या कामाला यश आले आहे. याबद्दल जैन सकल समाजाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रा.माणिकराव विधाते, मा.न.विपुल शेट्टीया, संजय चोपडा, रवींद्र बाकलीवाल, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, धीरज पोखरणा, कमलेश भंडारी, डॉ.सचिन गांधी, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, आदेश चेंगडिया, राजेंद्र बलदोटा, गोपाल मणियार, राजेंद्र गुगळे, कमलेश गुगळे, धनेश कोठारी आदिसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

         यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की जैन समाजाचा शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक स्तर सक्षम नसतो महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होणार आहे त्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती देखील होईल, धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे व लोकसहभागातून चौक सुशोभीकरणाचे कामे मार्गी लागले आहेत, त्याचबरोबर या माध्यमातून शहरीकरणाचे रूप प्राप्त होत असून पुढील वीस वर्षाचे नियोजन करून कामे मार्गी लावले आहेत. शहरात यापूर्वी कधी ही न झालेले कामे पूर्णत्वाकडे जात आहे मला व्यक्तिगत विरोध करू द्या मात्र विकासाला विरोध करून विकासाला अडथळा निर्माण करू नका एक-एक अडचण दूर करीत विकासाची कामे मार्गी लावली जात आहे जैन समाजाचेअल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लागले जातील असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

         रवींद्र बाकलीवाल म्हणाले की जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो, या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत पत्र व्यवहार करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला त्यामुळेच महामंडळ स्थापना साठी मदत झाली आहे. त्याचे फायदे काय आहे ? हे  समाजाला सांगण्याचे काम केले जाईल असे ते म्हणाले

   कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी नगरसेवक विपुल शेटिया यांनी केले तर आभार प्रदर्शन आदेश चेंगडिया यांनी मानले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post