विकास कामांसह धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला - आ. संग्राम जगताप



 केडगाव येथील जैन धर्मस्थानक परिसरातील सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : शहराच्या विकास कामांबरोबरच धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येत आपले पारंपरिक सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करीत असतात प.पूज्य आनंदऋषी महाराज यांचे समाधी स्थळ आपल्या शहरात असून देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात त्यामुळे समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे, केडगाव येथील जैन स्थानक परिसराचा विकास व्हावा त्यासाठी मोठे निधी उपलब्ध करून दिला आहे, केडगाव उपनगराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले     केडगाव येथील जैन धर्मस्थानक परिसरातील सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी माजी नगरसेवक विपुल शेटिया, केडगाव जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पन्नालालजी बोकरिया, ओस्तवाल सर, राजेंद्र मुनोत, बाबूलालजी चोरडिया, संजय संचेती, सोहनजी बरमेचा. कमलेश गुंदेचा, संतोष शेटिया 

धीरज चोरडिया, मुकेश बरमेचा, धीरज बरमेचा, विपुल कांकरिया, रुपेश गुगळे, किरण सुराणा, सचिन पोखर्णा , पारस शेटिया, जिनेश मालू, राहुल शेटिया, मयूर चोरडीया,रमेश मुनोत, निखिल संचेती, उमेश बलदोटा, सुशील फिरोदिया, कमलेश फिरोदिया, सचित संचेती, राजूशेठ भंडारी, भरत भंडारी, महावीर भंडारी, तेजस संचेतीप्रितेश बाफना, आदी उपस्थित होते. 

       पन्नालालजी बोकरिया म्हणाले की, केडगाव उपनगरामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने राहत असून त्यांना धार्मिक कार्यक्रमासाठी जैन स्थानकाची निर्मिती केली या परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे जैन स्थानक परिसराला सौंदर्यकरणाचे रूप प्राप्त होईल असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post