सर्व ओबीसी समाजाने महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या मागे उभे राहावे : आ. योगेश टिळेकर



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर – राज्यात जातीय वाद वाढत आहे. जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र काहीजण करत आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्र येते हिंदुत्वासाठी  काम करावे. याआधीच्या कॉंग्रेसच्या राजवटीत केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने राजकारणचे केले गेले. पण राज्यात सर्व समाजांसाठी महामंडळाची स्थापना करून युती सरकारने सर्व समाजांना न्याय देत या महापुरुषांना अभिप्रेत असेलेले काम केले आहे. सर्वांना न्याय देणाऱ्या महायुतीचीच सत्ता पुन्हा राज्यात येणे आवश्यक आहे. राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे तिन्ही नेते सरकार चालवण्यास अनुभवी व सक्षम नेते आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी अहिल्यानगर मधील सर्व ओबीसी समाजाने महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या मागे उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी समाजाचे नेते व विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांनी केले.


            आमदार योगेश टिळेकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरला धावती भेट दिली असता महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आ.टिळेकर यांचे तारकपूर भागात महायुतीच्या वतीने स्वागत केले. यावेळी झालेल्या बैठकीत आ.टिळेकर बोलत होते.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, महायुतीचे विधानसभा निवडणुकीचे समन्वयक महेंद्र गंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.माणिक विधाते, बाळासाहेब भुजबळ, धनंजय जाधव, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी, डॉ.रणजीत सत्रे, सुमित कुलकर्णी, दगडू पवार आदींसह प्रमुख पदाधिकारी व महिला उपस्थित होते.



            यावेळी किशोर डागवाले म्हणाले, आ. योगेश टिळेकर हे ओबीसी समाजाचे उभरते नेतृत्व आहे. त्यांनी केलेल्या कामाची पावतीच त्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून मिळाली आहे. चांगल्या समाज कामाची दखल घ्त्लीच जाते. नगर मधील ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी आ. टिळेकर यांनी एक दिवस द्यावा. याधीच्या काँग्रेसच्या राजवटीत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक झाले नाही. गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागीस राज्यातील महायुती सरकारने त्वरित मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजनही झाले. तसेच महायुती सरकारने संत सावता महाराजांच्या अरण या तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा देऊन १०० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. राज्यातील महायुती सरकारने ओबीसी समाजाला मोठा न्याय दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार यावे यासाठी या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना विजयी करावे, असे आवाहन केले.

            यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, नगरमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज आहे. ओबीसी समाज सातत्याने युतीच्या मागे उभा आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही सर्व ओबीसी समाजाने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी पाठिंबा द्यावा.

            यावेळी जालिंदर बोरुडे, सुधीर पुंड, अनिल निकम, राहुल रासकर, अनिल इंगळे, चंद्रकांत पुंड, भाऊसाहेब कोल्हे, एन.बी. बनकर, सुमित खामकर, लवेश गोंधळे, अरविंद कोल्हे, अमोल निस्ताने, रमेश चिपाडे, अशोक हिंगणे, सावित्री शक्ती पिठच्या अध्यक्षा कल्याणी गाडळवकर, उपाध्यक्षा किरण कोतवाल, कार्याध्यक्षा अशा डागवाले, सचिव सुरेखा विधाते, सुरेखा घोलप, विजया भांबरकर, अश्विनी दळवी, स्नेहल बुकने, अनुराधा जोशी, मीनाक्षी जाधव, रोहिणी दळवी, अश्विनी दळवी, अनुरीता झगडे, रोहिणी बनकर, शारदा काजळे आदी उपस्थित होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post