राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष पदी ऐश्वर्या ढोरजकर यांची वर्णी !



माय नगर वेब टीम 

अहमदनगर : महिलांवरील दिवसेंदिवस वाढणारा अन्याय व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक माता-भगिनी रस्त्यावर उतरल्या त्यापैकीच एक असणाऱ्या ,सौ.ऐश्वर्या भाऊसाहेब ढोरजकर गेले अनेक वर्षापासून खासदार निलेश लंके यांच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीत महिला आघाडीत उल्लेखनीय भूमिका बजावत एक आक्रमक व अभ्यासू महिला नेतृत्व म्हणून समस्त अहिल्यानगर जिल्ह्याला ज्ञात असणाऱ्या ऐश्वर्या ताई यांची खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

             विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निलेश लंके यांना विजयी करण्यासाठी तालुका पातळीवर महिला भगिनींचे संघटन वाढविण्यासाठी व महिला सक्षमीकरणाचा लढा सक्षम करत महिला एकत्रित करण्यात डोरसकर यांचा महत्त्वाचा सहभाग सहभाग आहे .ऐश्वर्या ताई ढोरजकर ह्या 2016 पासून निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या महिला समुपदेशक आहेत महिला मुलींना मार्गदर्शन करणे तसेच महिलांच्या आरोग्यावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींबद्दल शाळा कॉलेजवर जाऊन माहिती देणे हे काम त्या करत आहेत आणि भविष्यातही करत राहणार याची खात्री असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केलेली आहे .कुठलेही आंदोलन असो की उपोषण किंवा राजकीय कार्यक्रम यात एक अभ्यासू महिला संघटक म्हणून सहभाग नोंदवणाऱ्या ढोरसकर यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित शिवस्वराज्य यात्रे दरम्यान निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ,अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके तसेच युवकांचे नेतृत्व मेहबूब भाई शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि पारनेर नगरकर रहिवासी यांच्या उपस्थितीमध्ये पद नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. 

महिला मुलींवर वाढत असलेले अत्याचाराचे प्रमाण तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेली असुरक्षितता याच्यावर मात करण्यासाठी महिलांनी समाजात पुढे यावे व आवाज उठवावा असे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पवार साहेब आणि  सुप्रिया ताईंचे मत आहे.

यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके यांनी आपले मत व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post