गाडे यांच्या भाजप प्रवेशाने राजकारणात होणार उलटफेर ! कर्डिले यांना राहुरी तालुक्यातूनच मिळणार मताधिक्य ? समर्थकांचा दावा राहुरी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

माय अहिल्यानगर वेब टीम 

अहिल्यानगर : राहुरी- नगर -पाथर्डी मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मतदारसंघात चालू असलेल्या घडामोडी धक्कादायक ठरत आहेत. राहुरी येथील बारागाव नांदूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे तसेच सात्रळ गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गाडे यांनी  नामदार राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदार संघात मोठा फेरबदल होणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. राहुरी तालुक्यातुनच शिवाजी कर्डिले यांना मताधिक्य मिळणार असल्याचा दावा कर्डिले समर्थकांकडून करण्यात येत आहे.

       राहुरी तालुक्यातुन कर्डिले यांना मोठे मताधिक्य देण्याचा मानस राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. राहुरी तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो तरुणांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत कर्डिले यांच्या  नेतृत्वावर विश्वास दाखवत कर्डिले यांना साथ देण्याचे ठरविल्याने कर्डिले समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. निवडणूक जाहीर झाल्या नंतर कर्डिले गटात अनेक दिग्गज सामील झाल्याने कर्डिलेंसाठी निवडणूक सोपी जाणार असल्याचे कर्डिले यांचे कार्यकर्ते सांगत आहे.

       राहुरी तालुक्यातील धनंजय गाडे व भास्करराव गाडे या दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे कर्डिले समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. तर विरोधी गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असुन होम ग्राउंड वरच विरोधी उमेदवाराला घेरण्याचा राजकीय डाव कर्डिले यांच्या यंत्रनेकडून वापरला गेल्याचे दिसून येते. कर्डिले यांना मतदार संघात वाढता पाठिंबा विजयापर्यंत पोहोचविणार असल्याचा अंदाज कर्डिले समर्थकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

_________________________

अक्षय कर्डिले यांचे संघटन कौशल्य !

______________________________

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात तरुणांची फळी तयार केली आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात असणारा मित्रपरिवार कर्डिले यांच्या प्रचारात  सक्रिय झाला असल्याची माहिती कर्डिले समर्थकांकडून देण्यात आली. अक्षय कर्डिले यांच्यामध्ये असलेले संघटन कौशल्य या निवडणुकीत निश्चितच  शिवाजी कर्डिले यांच्या पथ्यावर पडणार असून कर्डिले यांचा मोठा मताधिक्क्याने विजय होणार असल्याचा दावा खोसपुरी गावचे माजी सरपंच सोमनाथ हारेर यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post