मतदार संघात हजारो तरुणांचा कर्डिले गटात प्रवेश!


 सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांची जाण असणारा नेता म्हणून कर्डिले यांची ओळख- मधुकर मगर   विजयाचा ठाम विश्वास : कर्डिले यांच्यामध्येच सर्वसामान्य, शेतकरी यांच्या समस्यांचे निराकारण करण्याची धमक !

माय अहिल्यानगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगर- पाथर्डी- राहुरी मतदार संघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीसाठी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही तोच गावोगावी कार्यकर्ते, मतदार स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन कर्डिले यांच्या प्रचाराचे नियोजन करत आहेत.तसेच कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना गोरगरीब, शेतकरी यांच्या समस्यांची जाण आहे. त्यांनी केलेली विविध विकासकामे व त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यांमुळे माजी मंत्री कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास  बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांच्यासह जेऊर पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

      कर्डिले यांच्या प्रचारात गावोगावी कार्यकर्ते, मतदार स्वयंस्फूर्तीने बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करत आहेत. जेऊर पंचक्रोशीतील विविध कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली त्यावेळी बोलताना मधुकर मगर यांनी सांगितले की, कर्डिले यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात घेतलेली गरुड झेप ही केवळ त्यांच्या विकास कामांमुळेच आहे.  सर्वसामान्य तसेच शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या समस्यांचे निराकरण करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कर्डिले यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.

मतदारसंघातील अनेक गावांमधून शेकडो, हजारो तरुण कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  निवडणूक मतदार, महिला, तरुणांनीच हातात घेतली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कर्डिले यांचा विजयरथ कोणीही रोखू शकत नाही. कर्डिले यांनी पराभव झाल्यानंतर देखील सर्वसामान्यांशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. २५ वर्षापासून भरत असलेला जनता दरबार त्यांचा अविरतपणे सुरूच आहे. कोणतीही व्यक्ती, शेतकरी, महिला, विद्यार्थी कर्डिले यांच्याकडे काम घेऊन गेल्यास त्या कामाचे निराकरण करण्याचे कसब कर्डिले यांनी आत्मसात केल्याने त्यांना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत आहे.


जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, दुग्धव्यवसाय करणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  नगर तालुक्याचे शिल्पकार म्हणून कर्डिले यांची ओळख आहे. कर्डिले यांच्या आमदारकीच्या काळात राहुरी, पाथर्डी, नगर तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने मतदारांना कर्डिले हेच आमदार व्हावे अशी मनोमनी इच्छा आहे. कर्डिले यांना गावोगावातून मिळत असलेला भरघोस पाठिंबा हि कर्डिले यांच्या विकास कामांची पोहोच पावती आहे.

        नगर- पाथर्डी -राहुरी मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांच्याच नेतृत्वाची गरज असल्याचे मत विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी कर्डिलेंशिवाय पर्याय नाही. सर्वधर्मसमभाव तसेच कधीही जातीपातीचा राजकारणात न अडकता मतदार संघाचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात सदैव झटणारे नेतृत्व म्हणून कर्डिले यांच्याकडे पाहिले जाते. कर्डिले यांच्यापेक्षा मतदार संघातील नागरिकच स्वयंस्फूर्तीने प्रचारात उतरले असून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास विविध कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून  व्यक्त केला. यावेळी जेऊर पंचक्रोशीतील विविध कार्यकर्ते महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________________

 नगर तालुक्याचे शिल्पकार म्हणून शिवाजी कर्डिले यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे कर्डिले यांना नगर- पाथर्डी- राहुरी मतदार संघाचे शिल्पकार म्हणून लवकरच ओळखले जाईल. त्यांनी नगर, राहुरी तसेच पाथर्डी तालुक्यातील विविध समस्या आमदारकीच्या काळात मार्गी लावलेल्या आहेत. विकासाचे रोल मॉडेल म्हणून मतदार संघात विकास करावयाचा असेल तर कर्डिलें शिवाय पर्याय नाही असे मत अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे यांनी व्यक्त केले.

_______________________________

सर्वसामान्य शेतकरी, महिला, तरुणवर्ग यांना न्याय देण्याचे काम अविरतपणे कर्डिले यांच्याकडून सुरू आहे. तळागाळातील कार्यकर्ते तसेच सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणाऱ्या कर्डिलेंविषयी सर्वांच्या मनाचा सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झालेली आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे जेऊर गावच्या सरपंच सौ. ज्योती तोडमल यांनी सांगितले.

========================================

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post