मोहटादेवी यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ ; खा. नीलेश लंके, राणीताई लंके यांची संकल्पना




यात्रेचे आठवे वर्ष 

सुपा गटातील महिला यात्रेस रवाना 
माय नगर वेब टीम 
पारनेर :  खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून गेल्या आठ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नवरात्र यात्रोत्सवास शुक्रवारी मोठया उत्साहात प्रारंभ झाला. खा. लंके व राणीताई लंके तसेच नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्यानंतर हंगे शिवारातून शेकडो बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या. 
      शुक्रवारी सकाळी हंगे शिवारात एमआयडीसी लगतच्या मैदानावर सुपा गटातील विविध गावांच्या बसेस एकत्रीत झाल्या. प्रत्येक बसेसमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आल्यानंतर या बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या. दुसऱ्या माळेच औचित्य साधून यात्रेत सहभागी झालेल्या महिलांना हिरव्या रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. यात्रेत सहभागी झालेल्या बसेसमध्ये अग्रभागी असलेल्या बसची फुलांनी सजावट करण्यात आली होती. खा. लंके व राणीताई लंके यांनी या बसेसला हिरवा झेंडा  दाखविल्यानंतर बसेसचे प्रस्थान झाले. 

यावेळी दिपक पवार, विजय पवार, सचिन पवार, सचिन पठारे, बाळासाहेब यादव, सुवर्णा धाडगे, संग्राम इकडे, बंडू साबळे, भाऊसाहेब भोगाडे, दौलत गांगड, डॉ. अजिंक्य गवळी, बबनराव गवळी, विकास म्हस्के, राजेंद्र दळवी, राजेंद्र शिंदे, प्रकाश गुंड, ज्ञानदेव जगताप, जालींदर काळे, पुनमताई मुंगसे, सतिश भालेकर, अमोल यादव, कारभारी पोटघन, संजय तरटे, लकी कळमकर, राजू शेळके, संदीप मगर, दादा शिंदे, दत्ता दिवटे, संदीप वाघमारे, अरूण कळमकर, गोरख उबाळे, कांतीलाल भोसले, संतोष तरटे, दिलीप गुंड, सचिन साठे, सुधीर लाकूडझोडे, विपुल सावंत, संतोष ढवळे, अक्षय थोरात, अमोल पवार यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

लंके खासदार झाले, मात्र उपक्रम विसरले नाहीत
 
संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असा हा उपक्रम आहे. आमदार म्हणून काम करताना केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने नीलेश लंके यांना लोकसभा निवडणूकीत विजयी केले. आठ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम लंके हे लोकसभेत गेल्यानंतरही विसरलेले नाहीत.
सुदाम पवार
मा. सभापती


लंके कुटूंबाचा जिव्हाळा बोध घेण्याजोगा  
 
राणीताई लंके या महिलांमध्ये फिरत आहेत, त्यांच्या गाठी भेटी घेत विचारपुस करत आहेत. आम्ही पुढारी मंडळी व्यासपीठावर बसलेलो असताना राणीताई मात्र माता भगिणींची विचारपूस करत आहेत. लंके कुटूंबाचा सर्वसामान्य जनतेसोबत असलेल्या जिव्हाळयाचा बोध घेण्यासारखा आहे. 

राणीताईंना आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचंय 
पाच वर्षांपूर्वी नीलेश लंके हे तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झाले. या पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. लंके यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वर्षभर काही ना काही उपक्रम राबविले जातात. चार पाच वर्षापूर्वी नीलेश लंके हे खासदार झाले. त्यामागे जनतेचे आशिर्वाद आहेत. असेच आशिर्वाद शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राणीताई यांना देऊन त्यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचे आहे. 
बाबाजी तरटे
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती  


तिसगांव येथे फराळाची व्यवस्था 

मोहटादेवी यात्रोत्सवामध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी प्रवासादरम्यान तिसगांव येथे फराळाची व्यवस्था करण्यात आली असून खा. नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके हे  तेथील व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत. 

यात्रेसोबत रूग्णवाहिका 

यात्रेदरम्यान महिलांमध्ये  आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास यात्रेसोबत डॉक्टरांची टीम असलेली रूग्णवाहिका तैनात असून त्रास होणाऱ्या महिलेवर तात्काळ उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे.
 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post