पालकमंत्र्यांनी पारनेर मतदारसंघातील कामे सूडभावनेतून अडवली :खासदार नीलेश लंके यांचा आरोप



देवीभोयरे फाटा ते खडकी रस्त्याचे भुमिपूजन संपन्न 

माय नगर वेब टीम 

पारनेर : काही खोडील लोकांनी विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला.सूडाच्या भावनेतून पारनेर शहराची पाणीपुरवठा योजना अडवली.मंजूर रस्त्यांची कामे अडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करतानाच ही कामे माझ्या वयक्तीक स्वार्थासाठी होती का असा सवाल खासदार नीलेश लंके यांनी केला.आपल्यात राजकीय वाद असतील तर ते आपण पाहू.पण जनतेला वेठीस धरण्यात काय अर्थ आहे.असे खासदार लंके म्हणाले.त्यांचा रोख पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे होता.सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 

देवीभोयरे फाटा (पारनेर ) ते खडकी (नगर ) या ४८ किलोमीटर लांबीच्या व ३६३ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे भुमिपूजन अभासी पध्दतीने (ऑनलाईन ) राज्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्या हस्ते झाल्यानंतर पारनेर शहरात खासदार  लंके यांनी या रस्त्याचे प्रत्यक्षात भमिपूजन केले. त्यावेळी ते बोलत होते.  

     यावेळी अ‍ॅड. राहुल झावरे, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, बापूसाहेब शिर्के,सुदाम पवार,अर्जुन भालेकर,सुरेखा भालेकर,डॉ. विद्या कावरे,रा.या.औटी,संदीप चौधरी, योगेश मते, संजय लाकूडझोडे, डॉ.बाळासाहेब कावरे, महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

    खासदार लंके म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली सावड आहे.ते अडचणीत असताना आपण त्यांच्या बरोबर राहिलो.त्यामुळे त्यांनी आपण मागणी केल्यावर देवीभोयरे ते खडकी या ४८ किलोमीटर रस्त्याच्या कामाला एडीपीमधून तातडीने मंजुरी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आपण ही मागणी केली होती.पारनेर तालुक्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठे काम असल्याच दावा लंके यांनी केला.आता श्रेयासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे खासदार लंके म्हणाले.

       पारनेरच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावी यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतली.पारनेरचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्याचे साथीदार आहेत.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या योजनेला मंजुरी मिळेल असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला.


पारनेरच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे 

पारनेर शहराच्या विकासासाठी २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी दिला.मात्र लोकसभा निवडणुकीत मी पारनेरमध्ये मी ७५० मतांनी पिछाडीवर असल्याचे सांगत खा. लंके यांनी पारनेर शहरातील कार्यकर्त्यांना टोला लगावला. पारनेरच्या कार्यकर्त्यांनी आता आत्मपरीक्षण केले पाहिजे.

विधानसभा निवडणुकीत पारनेरकरांन चुका सुधारण्याची संधी असल्याचे खासदार लंके म्हणाले.

ज्याच्याकडे बुुंदी तो स्वतःला घेणारच ना !

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार हे सर्वांना माहीती आहे. ज्याच्या हातात बुंदी तो स्वतःला वाढून घेणार ना. असे सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी इतरांनी वेळ घालू नये. निवडणुका आल्यावर पावसाळ्यात भूछत्र उगवते त्याप्रमाणे काही लोक बैठका घेऊ लागले असल्याचे सांगत पारनेर नगर-मतदारसंघाची उमेदवारी राणी लंके यांनाच असल्याचे खा. लंके यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post