शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या उमेदवारीचा उद्या फैसला



शिवसैनिकांच्या मेळाव्यातून जाणुन घेणार मते

पारनेर नगर मतदारसंघात महाआघाडीत बिघाडी होणार की घडी पुन्हा घट्ट होणार

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले पारनेर विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीकडुन इच्छुक आहेत . मात्र महाआघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणीताई लंके यांना जाहिर झाली .

शिवसेने कडुन इच्छुक असणारे कार्ले बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत . असे झाल्यास महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे . शेतकरी प्रश्नांसाठी सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्ले यांना उमेदवारीची अपेक्षा होती . आता पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी नगर तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा उद्या गुरुवारी दि २४ रोजी निमगाव वाघा येथे आयोजीत केला आहे . यात सर्वांचे मते जाणुन घेतल्यानंतर कार्ले निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहेत .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post