ढवळपुरी गटातही गर्दीचा उच्चांक; आदिवासी पट्टयातील महिलांमध्ये उत्साह



 महिला भगिनींनी धरला लोकगीतांवर ठेका !

राणीताई लंके आकर्षणाचा केंद्रबिंदू 

माय नगर वेब टीम 

पारनेर :   अख्ख्या जनतेच मन जिंकलं आमच्या राणीताईनं ,चिमणी माझी उडून गेली, पिचली माझी बांगडी अशा एक ना अनेक लोकगीतांवर ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील विविध गावातील महिलांनी ठेका धरला अन अवघ्या वातावरणात उत्साह संचारला ! निमित्त होते , खासदार नीलेश लंके व जि.प. मा.सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या देवी देवदर्शनाचे ! 

         ढवळपुरी गटाचा मोहटादेवी दर्शनाचा आजचा (मंगळवार) पाचवा दिवस.सोमवारी टाकळी ढोकेश्वर गटात गर्दीचा विक्रम झाल्यानंतर आज ढवळपुरी गटातही गर्दीचा उच्चांक झाला. ढवळपुरी पट्टयातील ढवळपुरी सह पळशी, वनकुटा हे आदिवासी बहुल गावे आहेत मात्र, या गावातील महिला वर्गही मोठ्या उत्साहाने देवदर्शनासाठी सहभागी झाला होता. पारंपारिक वेशात आलेल्या महिलांमध्ये वेगळाच उत्साह संचारल्याचे दिसून आले. आजचा रंग लाल असल्याने महिला वर्गाने लाल साड्या परिधान केल्याने मंगल कार्यालय व परिसरात अवघे लालेलाल वातावरण निर्माण झाले होते.महिला भगिनींबरोबरच वयोवृद्ध महिला व युवतींचाही मोठा सहभाग दिसून आला.

        भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालय परिसरात विविध गावावरून येणाऱ्या गाड्या पोहोचण्यापूर्वीच खासदार नीलेश लंके,बंधू दीपक अण्णा लंके, राणीताई लंके, ॲड.राहुल झावरे हे स्वतः हजर राहून व्यवस्थेवर लक्ष देऊन होते.गर्दीने कार्यालय तुडुंब भरल्यानंतर राणीताई लंके यांना संयोजकांनी व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मात्र उपस्थित महिला वर्गात राणीताई या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने माता भगिनींशी हस्तांदोलन करत येता येता त्यांना उशीर झाला.

       यावेळी बाबाजी तरटे, अ‍ॅड. राहुल झावरे, अभयसिंह नांगरे, राजेंद्र चौधरी, बापू शिर्के, किरण ठुबे, संदिप चौधरी,नवनाथ बांगर,संभाजी रोहोकले,शिवाजी लावंड,भागाजी गावडे, शंकर रोहोकले,भागाजी कदम, प्रा.बबनराव भुजबळ, संदीप सालके,आर.आर. राजदेव , सचिन पठारे,बाळासाहेब हिलाळ,युवराज माळी, सत्यम निमसे,दत्ता शिंदे ,कुलदीप आबूज, संदीप भागवत, संदीप रोहोकले, भागा कदम, बाजीराव दुधाडे, पप्पू बांगर, युवराज माळी, दादा सुंबे, दत्ता कोरडे, बबन अडसूळ, योगेश शिंदे, अमोल पवार,अनिकेत चौधरी, संदीप वाघ, भाउसाहेब ठोकळ, अर्जुन कुलकर्णी, नितीन रांधवन, अप्पासाहेब शिंदे, आदीनाथ ढवळे, राजू रोडे, गणेश हाके, दत्ता भांड, गणेश मधे, भाउ सिनारे, गणेश सुंबे, संभाजी नरसाळे, उमेश नरसाळे, अविनाश नांगरे, प्रवीण नरसाळे, गणपत काळनर, विकास काळे, रामा साळवे, भाउ खामकर, टायगर शेख, सुभाष सुंबे, धिरज ठोकळ, गणेश दरेकर, दत्ता शिंदे, प्रसाद शिंदे, नवनाथ बांगर, बाळासाहेब हिलाळ आदी उपस्थित होते.

 राणीताईंची क्रेझ

विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राणीताई लंके यांची महिला वर्गात मोठी क्रेझ निर्माण झाल्याचा प्रत्येय आला.मंगलकार्यालयात आल्या पासून शेवटपर्यंत त्या महिला वर्गातच मिसळून राहिल्या.अनेक जणींनी त्यांच्या सोबत सेल्फी काढल्या.

लाडक्या बहिणी निवडणूकीपुरत्याच !

वनकुट्याच्या वयोवृध्द महिला लहानुबाई खैरे यांनी लाडक्या बहिण योजनेचा खरपूस समाचार घेतला.ही योजना केवळ निवडणूकीपुरतीच असल्याचे सांगत महिलांच्या प्रश्नांसाठी आता राणीताईलाच आमदार करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.


विजयाच्या घोषणा

राणीताई व्यासपीठावर येताच उपस्थित महिलावर्गाने उभे राहून हात उंचावत विजयाच्या घोषणा देत जणू त्यांना निवडणूकीसाठी पाठिंबाच दर्शविला. अख्ख्या जनतेच मन जिंकलं आमच्या राणीताईनं हे गाणं ध्वनीक्षेपकावर लावल्यानंतर महिलांनी पुन्हा ठेका धरला.

नेत्यांना घेतले खांद्यावर

राणीताईंचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर हॉलमध्ये बसलेल्या महिलांनी व्यासपीठावर येत राणीताई यांच्याबरोबर गाण्यावर ठेका धरत आनंद लुटला.तर यावेळी किरण ठुबे यांनी खा.लंके यांना खांद्यावर घेत ठेका धरला.संपुर्ण वातावरणात जोश निर्माण झाला होता.

खा.लंके यांची प्रार्थना

मोहटादेवी दर्शन यात्रेत मोठया संख्येने सहभागी झाल्याबद्दल खा.लंके यांनी महिलावर्गाला धन्यवाद देत माझ्या माता भगिनींना सुखी समाधानी ठेव अशी मोहटादेवी चरणी प्रार्थना केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post