सावली कधीच साथ सोडत नाही
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर :
प्रिय नगरकरांनो,
काही कारणास्तव मी स्वतः निवडणूक लढवत नसताना नगरकरांसाठी बदल तर झालाच पाहिजे, जो एक विकासाच्या राजमार्गावर घेऊन जाईल. आपल्या आजूबाजूचे नाशिक, पुणे यांनी केवढा मोठा विकास केला आणि आपण हा बॅकलॉग भरुन काढायचा आपल्या विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुक लढवायची ठरवले. काही तांत्रिक कारणांमुळे मी लढवत नाही तर कोण ही जबाबदारी लीलया पार पाडू शकेल असा विचार मी आणि माझे सहकारी करत असताना माझी पत्नी सुवर्णा चे नाव सर्वानुमते पुढें आले, तिने आधी शहराचे उपमहापौर पद भूषविले असल्याने तिला प्रशासनाचा अनुभव आहे आणि संघर्षाची तयारी आहे. चांगल्या काळात तर सगळेच साथ देतात पण काळ कसाही असू दे सावली कधीच साथ सोडत नाही. तसेच सुवर्णा ने प्रत्येक वेळी खंबीरपणे मला साथ दिली म्हणूनच मला विश्वास आहे की नगर विकासाचे जे माझे स्वप्न आहे ती चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात उतरवील. नगरकरानी जे प्रेम, आशिर्वाद मला दिले तसेच ते सुवर्णाला ही देतील व शहराला पहिल्या महिला आमदार करतील ही मला खात्री आहे.
आपलाच - संदीप भानुदास कोतकर
मा. महापौर
Post a Comment