अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवेल: डाॅ. सुजय विखे



बापाबद्दल नव्हे निष्क्रीय आमदाराबद्दल बोललो!

राजकन्येला बोलण्यासाठी भाग पाडणारेच त्यांचा घात करणार 

पठार भागात युवकांकडून जोरदार स्वागत

माय नगर वेब टीम 

संगमनेर : तालुक्यातील जनतेन तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे  कारण काय ॽ अहो ताई,लोकाशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असते.तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडोतोड उतर डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिले.


साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ सुजय विखे यांनी पुन्हा एकदा आ.बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.चाळीस वर्षे सर्व सतास्थान असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आले नाही.या भागात युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत.या निष्क्रीयतेवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढाला.आमच्या भागात येवून आमच्या वडीलावर वाटेल तशी टिका केली.पण आम्ही संयम दाखवून राजकारण करणारी माणस आहोत.सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे पाटील परीवाराने नेहमीच आवाज उठवला.या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत.साकूरची सभा प्रस्थापितांच्या विरोधातील परीवर्तनाची नांदी असल्याचा इशारा डाॅ विखे पाटील यांनी दिला.


वर्षवर्षानुवर्षे ज्या जनतेन निवडून दिले त्यांचा बाप तालुक्याच्या राजकन्या काढायला निघाल्या.पण कोणाच्या बापाबद्दल नाही तर तालुक्याच्या आमदाराच्या निष्क्रीयेतवर बोलल्याचा टोला लगावून विखे पाटील म्हणाले की लोकशाही प्रक्रीयेत जनता मायबाप असते.येणार्या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल तालुक्याचा बाप कोण आहे.पण ताईच्या गाडीत बसणारे त्यांना बोलायला भाग पाडत आहेत.ताईच्या गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलै.


तालुक्यातील युवकांनी मनगटातील ताकद दाखवून या प्रस्थापितांना धडा शिकवावा असे आवाहन करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही जेवढा आवाज दाबाल तेवढा तुमच्या घरापर्यत येईल असे डाॅ विखे यांनी ठणकावून सांगितले.


राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याने तालूक्याचा आमदार सुध्दा महायुतीचा आपल्याला करायचा आहे.उमेदवार कोणी असो डाॅ सुजय विखे तुमच्या प्रश्नासाठी बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


याप्रसंगी बाबासाहेब कुटे गुलाबराजे शेळके यांच्यासह अनेक सरपचांनी भाजप मध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post