उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! तिकीट जाहीर झालेला ‘हा’ उमेदवार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार



माय नगर वेब टीम 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी तिकीट जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे.

‘या’ नेत्याने घेतली माघार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच या ठिकाणी एमआयएमकडून नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पार पडणार होती.


का घेतली माघार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती म्हणजे एमआयएमचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे.


शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post