माय नगर वेब टीम
जालना - आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरु यांच्यासोबत बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''अन्यायाचा विरोधात आम्ही उभे आहोत. जे आम्हाला संपवायला निघाले त्यांना संपवायचं आहे. आमचं आज समीकरण पक्क झालं आहे. आमचं समीकरण एकमताने पक्क झालं आहे.''
'आता परिवर्तन होणार, सुफडा साफ होणार आहे'
ते म्हणाले, सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली. एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही, असं ठरलं. जरांगे म्हणाले की, ''आज मराठा, मुस्लिम, दलीत आज अधिकृत एकत्र आला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चालणार आहे. लोकशाहीप्रमाणे तुम्ही जसे उभे (निवडणुकीत) राहिला आहात, तसेच आम्ही देखील उभे राहत आहोत. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार. आता परिवर्तन होणार, सुफडा साफ होणार आहे. पाटील म्हणाले, आम्ही धर्म परिवर्तन करायला नाही आलो, आम्ही सत्ता परिवर्तन करायला आलो.
Post a Comment