माय नगर वेब टीम
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या पहिल्या यादीनंतर आता मनसेची यादी तिसरी यादी समोर आली आहे. मनसेने मंगळवारी रात्री उशिरा दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता मनसेने १३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत मनसेने परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळवार निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात दौरे केले होते. ठाकरेंनी राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आतापर्यंत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने आतापर्यंत ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत
नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का
नाशिक पश्चिम मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली. भाजपचे दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. भाजपमधून मनसेत प्रवेश केल्यानंतर दिनकर पाटील हे विधानसभा निवडणुकीतील नाशिकमधील मनसेचे पहिली उमेदवार ठरले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिनकर पाटील यांना मनसेने उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे.
मनसेने परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने धनंजय मुंडे यांचं टेन्शन वाढलं आहे. परळीतील माजी नगराध्यक्ष एन. के. देशमुख यांचे पुतणे अभिजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. अभिजीत देशमुख गेल्या काही वर्षांपासून परळीतील राजकारणात सक्रिय झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघ -- उमेदवारांचे नाव
अमरावती -- पप्पू उर्फ मंगेश पाटील
नाशिक पश्चिम -- दिनकर धर्माजी पाटील
अहमदपूर-चाकूर -- डी. नरसिंग भिकाणे
परळी -- अभिजित देशमुख
विक्रमगढ -- सचिन राम शिगडा
भिवंडी ग्रामीण -- वनिता शशिकांत कधुरे
पालघर -- नरेश कोरडा
शहादा -- आत्माराम प्रधान
वडाळा -- स्नेहल सुधीर जाधव
कुर्ला - प्रदीप वाघमारे
ओवळा- माजिवडा - संदीप पाचंगे
गोंदिया -- सुरेश चौधरी
पुसद -- अश्विन जयस्वाल
Post a Comment