सिद्धार्थनगर प्रचार फेरीस महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : गेल्या दहा वर्षात आ.संग्राम जगताप यांनी शहरातील प्रभाग नऊ मधील सर्व भागांसह सिद्धार्थ नगर परिसरातील अनेक समस्या सोडवून विकास कामे केली आहेत. यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते बालिकाश्रम रोड पर्यंतचा रस्त्याचे काँक्रीटीकरण, व्यायामाशाळा व तालीम, हाय मास्क, ख्रिश्चन स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतचे काम, बुद्ध विहार सुशोभीकरण, दोन समाज मंदिर, मनपाच्या दवाखान्याचे नूतनीकरण अशा विविध विकास कामाच्या माध्यमातून सिद्धार्थ नगरचा कायापालट केला. आमदार जगताप यांनी नगर शहरासाठी उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांच्या कामावर नगरकर त्यांना तिसऱ्यांदा विजयाचा कौल देतील, असा विश्वास माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ लाल टाकी सिद्धार्थ नगर परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहूजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक दगडू मामा पवार, धनंजय जाधव, पोपटराव पाथरे, कौशल गायकवाड, गणेश पठारे, अजय पठारे, सुनील भवर, अंकुश मोहिते, निलेश ससाने, सनी कांबळे, किरण गुंजाळ, किरण दाभाडे, श्रीकांत घोरपडे, सोनू लहारे, अनिल वाघमारे, सुनिता बहुले, अशा रोकडे, पांडुरंग घोरपडे, किशोर पटेकर, योगेश सुरसे, सागर भराड आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीस महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठीक ठिकाणी आमदार जगताप यांचे महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले तर ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले.
Post a Comment