माय नगर वेब टीम
राहुरी ः राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले विरुद्ध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या काटे की टक्कर पहावयास मिळत आहे. परंतू, दिवसेंदिवस महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना अनेकांकडून पाठिंबा जाहीर केला जात आहे. त्यातच आता एकलव्य भिल्ल सेनेचे पाठींबा जाहीर केल्या मुळे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. तसेच भिल्ल समाज बांधवांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला आहे.
एकलव्य भिल्ल सेनेने दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात काय म्हणालेय....
महोदय,
एकलव्य भिल्ल सेना या अदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने आपणास अतिशय आनंदाच्या वातावरणात कळविण्यात येते कि राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील तमाम अदिवासी भिल्ल समाजाने माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आपण जेव्हा या मतदार संघाचे आमदार होता त्यावेळी आपण अदिवासी भिल्ल समाजाचे अनेक सामाजिक व विधायक कामे मार्गी लावले आहेत. त्यामध्ये घरकुले, जातीचे दाखले, रेशन कार्ड, अदिवासी मुलांना शिष्यवृत्ती, महिला बचत गटांना भरगोस मदत तसेच अनेक गरजू नागरिकांना आपण सढळ हाताने मदत केली आहे.
याची जाणीव आदिवासींना आहे. मागील वेळी समोरील उमेदाराच्या भूल थापांना बळी पडून आदिवासी समाजाने सदर उमेदराला पाठींबा दिला होता. परंतू, गेल्या पाच वर्षामध्ये आदिवाचीचे कोणतेही कामे झाली नाही. त्यामुळे सर्व आदिवसी समाजाने आपणास जाहीर पाठींबा देऊन महाराष्ट्रामध्ये एक नंबर मताधिक्याने निवडून देण्याचा एकमुखीने निर्णय घेतला आहे. तरी आपण आदिवासींचा पाठींबा स्वीकारून आगामी काळामध्ये अदिवासी समाजाची कामे मार्गी लावावी हि आपणास नम्र विनंती. असे पाठिंव्याच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव मुरलीधर अहिरे यांच्या सह्या आहेत.
Post a Comment