अजितदादांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो, पण…; आर.आर. पाटलांवरील आरोपांवर लेक स्मिता पाटील काय म्हणाल्या, पहा...



माय नगर वेब टीम 

सांगली - माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आर. आर. पाटील यांनी 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाइलवर सही केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. तसेच ती फाइल देखील त्यांनी दाखवली होती. यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्मिता पाटील म्हणाल्या,’अजित पवारांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. ते आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. या आरोपांचं खंडन करायला आबा नाहीत. आपली संस्कृती सांगते हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलत नाहीत. अशीही पाटील यांनी म्हटलं आहे.

“अजितदादा वडिलांसमान, पण…”

आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असं अजित पवारांनी म्हटलं. आबांना सांगतो होतो की तंबाखू खाऊ नका. तरी ते माझ्या नकळत ते तंबाखू खायचे, असं अजित पवार म्हणाले. त्यावर स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांच्या वक्तव्याने खूप वाईट वाटलं. दादांनी आबांच्या पश्चात आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. साडेनऊ वर्षानंतर आबांविषयी अजितदादा ही खदखद व्यक्त करतायत. याच वाईट वाटतंय. दुसरं कोणी बोललं असतं तर वाईट वाटलं नसतं. पण अजितदादा आमच्यासाठी वडीलधारे आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं स्मिता यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post