माय नगर वेब टीम
संगमनेर : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर भाजप नेते सुजय विखे यांच्या सभेत वसंत देशमुखांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत देशमुखांना अटक करण्याची मागणी केली होती.
यानंतर काल पुण्यातुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुखांना अटक केली. वसंत देशमुखांना अटक झाल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता संगमनेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाजप नेते सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील एका सभेत वसंत देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सभेत देशमुख यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर खालच्या भाषेत टीका केली होती. या भाषणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला.
देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल 12 तास ठिय्या मांडला होता. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली होती.
Post a Comment