काहीजण निवडणुकीत भूछत्रासारखी दिसतात, नंतर निघून जातात, पण मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध : आ.संग्राम जगताप

 


शहरातील प्रतिष्ठित नगर क्लबच्या सदस्यांशी आ.जगताप यांचा संवाद

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  – शहरातील पाण्याचा, रस्त्यांचा, ड्रेनेज लाईन या मुलभूत सुविधांचा प्रश्न सोडवला आहे. शहरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत, तर बरीच कामे प्रगतीपथावर आहेत. आता उद्योग व रोजगार वाढण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर शहराच्या जवळच ६०० एकर जागेत नवी एमआयडीसी लवकच निर्माण करत आहोत. शहराला नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात शहरात अनेक उड्डाणपूलही होणार आहेत. चहूबाजूंनी शहराचा सर्वंगीत विकास होत असल्याने आता नगर शहरात अनेक मल्टी नॅशनल ब्रान्ड येत आहेत. त्यामुळे नगर शहराची वाटचालही मेट्रो शहराकडे होत आहे. शहराचा विकास करताना मी सुखदुःखात तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे. पण बरीच लोक निवडणूक आली की भूछत्रा सारखी दिसतात व नंतर निघून जातात. २०१४ लाही काहीजण आले होते पण परत काही सापडले नाहीत. पण मी कायम जनतेसाठी उपलब्ध आहे. शहराचा आजपर्यंत जो विकास करू शकलो तो जनतेने दिलेल्या मत रुपी आशीर्वादामुळेच करू शकलो. त्यामुळे शहरच्या प्रगतीसाठी पुन्हा मला सर्व जनतेच्या आशिर्वादाची पुन्हा गरज आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.


            नगरमध्येही आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी प्रचार सुरु केला असून शहरात विविध भागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी वर आ.जगताप भर देत आहेत. आज सकाळीच शहरातील उच्चभ्रू व प्रतिष्ठित नागरिकांच्या नगर क्लबच्या सदस्यांची संवाद साधून गेल्या पाच वर्षात शहराचा आमदार या नात्याने केलेल्या विकास कामांचा धावता आढावा आ.जगताप यांनी घेतला. यावेळी नगर क्लबच्या वतीने उपाध्यक्ष सीए.अशोक पितळे यांनी आ.जगताप यांचा सत्कार करून निवडणुकीस शुभेच्छा दिल्या. यावेळी क्लबचे सचिव नरेंद्र फिरोदिया, संचालक सुमतिलाल कोठारी, सिए. प्रवीण कटारिया, पेमराज बोथरा, हेमेंद्र कसावा. दिलीप बोरा, अॅड.जयदीप भापकर, अॅड.किशोर देशपांडे, स्त्यान गुंदेचा, डॉ.जयंत भापकर, सुभाष जग्गी, अॅड.सुभाष काकडे आदींसह मोठ्या संख्यने क्लबचे सदस्य उपस्थित होते.


            यावेळी सिए अशोक पितळे म्हणाले, नगर शहराच्या अर्थकारणाला खेळ बसली आहे. ती दूर करण्यासाठी एखादा मोठा प्रकल्प नगरमध्ये येणे आवश्यक आहे. यासाठी नव्या एमआयडीसीमध्ये असा एखादा प्रकल्प व्हावा यासाठी आमदार जगताप यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.


            प्रस्ताविकात सुमतीलाल कोठारी म्हणाले, पुढील वीस ते पंचवीस वर्षाचा विचार करून आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू केली आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष स्व.नवनीतभाई बार्शीकर यांच्यानंतर नगरमध्ये एवढे विकास कामे झालेली नाहीत. आज जर भाई असते तर तेही म्हणाले असते ‘तू माझी गादी उत्तम प्रकारे चालवत आहेस. अशा शब्दात कौतुक करून नगर शहराचा सर्वांगीण विकास करणारे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी पूर्ण नगर क्लब व सर्व सदस्य उभे असल्याची ग्वाही दिली.


            यावेळी पेमराज बोथरा व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनीही आमदार जगताप यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक करून त्यांना विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अॅड.अशोक कोठारी, डॉ.आर.आर. धुत, राजू भिंगारवाला, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, अशोक मोरे, डॉ. निसार, सागर बोरा, किरण भंडारी, श्री बात्रा, कांती पटेल, श्री देवगावकर, राजेंद्र चोपडा आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post