भाजपाशी एकनिष्ठ, कर्डिलेंचे काम करू-सत्यजित कदम
माय नगर वेब टीम
राहुरी - राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपाने मला तयारी करायला लावली होती. मात्र ऐनवेळी शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केल्याने मी पक्षावर नाराज झालो होतो. मात्र आमचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्यावर नाराज नव्हतो. आता वरिष्ठ पातळीच्या नेत्यांबरोबर माझी चर्चा झाली असून माझी नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे मी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्याच बरोबर असून त्यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे. देवळाली प्रवरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
भाजपाचे आणि संघाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव भाजपाचे नेते हे शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कदम पिता-पुत्र नाराज होते. त्यामुळे ते बंडखोरी करतील काय अशी चर्चा मतदारसंघात होती. मात्र, कदम यांची शिवाजी कर्डिले, देशाचे राष्ट्रीय महामंत्री अनिल जैन, तसेच केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेत्यांबरोबर चर्चा झाली आहे. तुम्हाला संधी देऊन आमच्याबरोबर घेऊ असे वरिष्ठ नेत्याने सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही कालही भाजपाचे होतो आणि आजही भाजपाचे आहे. भाजप हीच आमची ओळख असल्यामुळे आम्ही पक्षाला कधीही सोडणार नाही. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यानुसार आम्ही महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचेच काम करू, असे देखील यावेळी बोलताना सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.
दरम्यान, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्व लढत झाली तर भाजपाचे उमेदवार म्हणूने देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. या निवडणुकीत भाजपाची सर्व ताकात लावून आम्ही आमचे सहकारी संसारे यांना विजयी करू, असे सत्यजित कदम यांनी सांगितले.
Post a Comment