श्रीगोंद्यात ठाकरेंचा मोठा डाव! अनुराधा नागवडे यांच्या हाती मशाल..., काय दिलाय आदेश पहा...

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  - श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजपाने आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पदाचे राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर अनुराधा नागवडे यांना लगेच महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर त्या निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२३) दुपारी मुंबईत त्यांनी हातात शिवबंधन बांधले. यावेळी तालुक्यातील शेकडो नागवडे समर्थक उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. अनुराधा नागवडे या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका देखील आहेत.

काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या देखील त्या जिल्हाध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रवेश करून मशाल या चिन्हावर उमेदवारी करण्याची पूर्ण तयारी अनुराधा नागवडे यांनी केली होती. त्या प्रमाणे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.  


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post